कृष्ण आणि भीष्म
भीष्म आपल्या ब्रम्हचर्य व्रताचे कठोर पालन करीत असत. एवढेच नव्हे तर ते कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन असत. युद्धाच्या दरम्याने कृष्णाने हाती शस्त्र न घेण्याची प्रतिज्ञा केली होती. परंतु भीष्मांनी त्या आधीच त्याच्याकडून आपल्यावर शस्त्र उचलण्याच वचन घेतलेले होते. कृष्णासाठी ही द्विधा स्थिती होती. अशात ते चाक घेऊन कृष्णाच्या दिशेने धावले ज्यामुळे दोघांचेही वचन सत्य सिद्ध झाले.