Android app on Google Play

 

भीष्म प्रतिज्ञा

 

एक दिवस शांतनू नदीच्या तीरावर फिरत होता तेव्हा तिथे चालणाऱ्या एका कन्येवर त्याची दृष्टी पडली. ती कन्या अतिशय सुंदर होती आणि शंतनू तिच्यावर मुग्ध झाला. त्याने त्या कन्येच्या पित्याकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. निषाद राजा म्हणाला की त्याची या विवाहाला कोणतीही हरकत नाही, परंतु शांतानुला त्याची कन्या सत्यवती हिच्या पुत्राच्या हाती राज्य सोपवावे लागेल. हे ऐकून शांतनू मन मारून तिथून निघून गेला. त्यानंतर तो अतिशय दुःखी राहू लागला जे पाहून भीष्मांनी त्याच्या मंत्र्यांना वडील दुःखी राहण्याचे कारण विचारले.. ते स्वतः निषाद च्या घरी गेले आणि त्यांनी वचन दिले की त्याला हवे तसेच होईल. इथेच त्यांनी आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शपथ देखील घेतली. हे पाहून निषाद राजा प्रसन्न झाला आणि त्याने आपल्या कण्याला देवव्रत सोबत पाठवून दिले.