Android app on Google Play

 

कृष्णाचे ह्रदय

 

 हिंदू धर्माच्या अनेक पवित्र स्थळांपैकी आणि चार-झामांपैकी एक असणारे जगन्नाथ पुरी हे श्रीविष्णू यांचं पवित्र स्थान मानलं जातं. या मंदिराशी निगडीत अतिशय रहस्यमय कथा ऐकिवात आहे.
स्थानिय मान्यंतांप्रमाणे या मुर्तीच्या आत श्रीकृष्णाच्या ह्रदयाचा एक भाग ठेवलेला आहे ज्यात श्रीविष्णूंचा वास आहे. असं म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूनंतर पांडवांनी त्याच्या शरिरावर दाहसंस्कार केले परंतू त्यांचे ह्रदय जळत राहिले. देवांच्या आज्ञेनुसार पांडवांनी ते पाण्यात सोडले. त्याने नंतर लाकडाचं रूप घेतलं.
इन्द्रद्युम्न राजा जे जगन्नाथाचे भक्त होते त्यांना ते मिळाले व त्यांनी लगेचच ते जगन्नाथाच्या मुर्तीत स्थापन केले. तेव्हापासून आजपर्यंत ते या मुर्तीच्या आत आहे. जर १२ वर्षांनी ही मुर्ती बदलते तरी ते ह्रदय मात्र हलत नाही, हा एक गुढ विषय आहे.