Get it on Google Play
Download on the App Store

कृष्णाच्या प्रेमिका आणि पत्नी

कृष्णाबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की त्याला १६ हजार पत्नी होत्या पण या गोष्टीत काही तथ्य नाही. त्याच्या फक्त आठ राण्या होत्या.
कृष्णाच्या ज्या १६ हजार बायकांबद्दल बोलले जाते त्या खरं तर भौमासूर खिंवा नरकासूर याच्याकडे बंधक बनवून ठेवलेल्या महिला होत्या. या सगळ्यांना कृष्णाने मुक्त केले होते. या सर्व महिला कुणा ना कुणाच्या आई, पत्नी किंवा बहिण होत्या ज्यांचं भौमासूराने अपहरण केलं होतं.
ब्रह्मवैवर्त पुराण, गीत गोविंद आणि कथांमधे याचा उल्लेख आहे की राधा, ललिता वगैरे कृष्णाच्या प्रेमिका होत्या. राधेच्या काही मैत्रिणीदेखील कृष्णावर प्रेम करायच्या ज्यांची नावं चित्रा, सुदेवी, ललिता, विशाखा, चम्पकलता, तुंगविद्या, इन्दुलेखा, रग्डदेवी आणि सुदेवी अशी होती. असं मानलं जातं की ललिता नावाच्या सखीला मोक्ष मिळाला नव्हता त्यामुळे तिने मिरा या नावाने पुन्हा जन्म घेतला होता.
श्रीकृष्णाची प्रेमिका राधा हिचा महाभारतात कुठेच उल्लेख आढळत नाही. याशिवाय सर्वात जुन्या हरिवंश आणि विष्णू पुराणात देखील राधेचा उल्लेख सापडत नाही. भागवत पुराणातही तिचा उल्लेख नाही. ब्रह्मवैवर्त पुराणाबद्दल असं म्हणतात की कदाचित ते चाणक्य किंवा गुप्त काळात लिहीलं गेलं आहे.