Android app on Google Play

 

श्रीकृष्णाने अनेकांना जिवंत केले

 

सांदिपनी ऋषींना जेव्हा गुरूदक्षिणा मागायला सांगितले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्या मुलाला एख राक्षस घेऊन गेला आहे, तेव्हा तुम्हा त्याला परत आणू शकाल तर बरे होई. कृष्णाने ऋषींच्या सुपुत्राला अनेक ठिकाणी शोधले परंतू तो कुठेच सापडला नाही. शेवटी राक्षस त्याला समुद्रात घेऊन गेला आहे असे समजल्याने कृष्ण समुद्राकडे गेले. नंतर असे समजले की सांदिपनी ऋषींच्या मुलाला यमराज घेऊन गेले आहेत. श्रीकृष्णाने यमराजाकडून त्याला परत मिळवले आणि गुरूदक्षिणा पूर्ण केली.
अर्जुनाच्या ४ पत्नी होत्या- द्रौपदी, सुभद्रा, उलूपी आणि चित्रांगदा.  द्रौपदीपासून  श्रुतकर्मा, सुभद्रेपासून अभिमन्यु, उलूपीपासून इरावत आणि चित्रांगदेपासून वभ्रुवाहन नावाच्या पुत्रांची प्राप्ती त्यास झाली.
अभिमन्यूचा विवाह महाराज विराट यांच्या उत्तरा या मुलीशी झाला. महाभारताच्या यपद्धात अर्जुनाला वीरगती प्राप्त झाली. हे युद्धा चालू असताना उत्तरा गर्भवती होती. तिच्या गर्भात अभिमन्युचा पुत्र वाढत होता. द्रोणपुत्र अश्वत्थामा याने पांडवांच्या वंशाला नष्ट करण्याचा संकल्प सोडून ब्रह्मास्त्र सोडलं.
या ब्रह्मास्त्रामुळे उत्तरेने मृत बालकाला जन्म दिला.  परंतू श्रीकृष्णाने उत्तरेच्या या मुलाला ब्रह्मास्त्राच्या संकल्पानंतरही जिवंत केलं. हाच मुलगा पुढे परिक्षित राजा म्हणून ओळखला जाऊ लागला.
कृष्णाने लोकांना जिवंत केल्याची अशी अनेक उदाहरणं आहेत. भीम पुत्र घटोत्कच याचा मुलगा बर्बरीक याची मान कापली गेली असूनही कृष्णाने त्याला महाभारतात युद्धाच्या शेवटापर्यंत जिवंत ठेवले होते.