Android app on Google Play

 

येशु ख्रिस्तावर असणारा श्रीकृष्ण व बुद्धांचा प्रभाव

 

खरं तर हा संशोधनाचा विषय आहे. पण आत्तापर्यंत ज्या लोकांनी याचा शोध घेतलाय त्यांचं हेच मत आहे की येशु ख्रिस्तांनी भारतभ्रमण केलं होतं. ते काश्मिर पासून जगन्नाथ मंदिरापर्यंत फिरले.

त्यांनी काश्मिरमधे एका बोद्ध मठात राहून साधना केली होती.  इथेच त्यांची एक समाधीही आहे. संशोधन करणारे सांगतात की श्रीकृष्णाचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला.  त्यांची जन्मकथादेखील कृष्णाच्या जन्मकथेशी जुळते.

लुईस जेकोलियेटने इ.स १८६९ मधे त्यांच्या ‘द बायबल इन इंडिया’ या पुस्तकात लिहीलंय की येशु ख्रिस्त आणि श्रीकृष्ण येशु यांच्यावर एक तुलनात्मक लेख लिहीला आहे. जीसस या शब्दाविषयीही त्यांनी लिहीललंय की हे नाव त्यांना त्यांच्या अनुयायांनीच दिले आहे. त्याचा संस्कृतमधे ‘मूल तत्त्व ’ असा अर्थ होतो.