Android app on Google Play

 

मार्शल आर्ट चे जनक श्रीकृष्ण

 

भारतीय परंपरा आणि जनश्रृतीनुसार श्रीकृष्णानेच मारशल आर्टचा शोध लावला. आधी याला कलारिपट्टू असं म्हटलं जात असे. या विद्येच्या सहाय्याने त्यांनी चाणूर आणि मुष्टिक सारख्या राक्षसांचा वध केला. तेव्हा कृष्ण १६ वर्षांचे होते. मथुरेचा दुष्ट राजाचा हाताच्या एकाच प्रहाराने मस्तक फोडून त्याचा वध केला होता. लोकं म्हणतात त्याप्रमाणे श्रीकृष्णाने या कलेचा विकास ब्रजभूमीत वनात केला. दांडिया-रास हे त्याचेच नृत्यरूप होय. कलारिपट्टू विद्येचे प्रथम गुरू श्रीकृष्णालाच मानलं जातं. पण त्यानंतर त्या विद्येचा प्रचार अगस्ति ऋषींनी केला.


या विद्येमुळेच नारायणी सेना भारतातली सर्वात भयंकर आक्रमक सेना झाली होती. कर्नाटक आणि केरळमध्ये आजही ही विद्या प्रचलित आहे.