Get it on Google Play
Download on the App Store

चिरतरूण होते श्रीकृष्ण

प्रभू श्रीकृष्णांचा जन्म मथुरेत झाला होता.  त्यांचं बालपण हे गोकुळ, वृंदावन, नंदगाव, बरसना इत्यादी ठिकाणी गेलं. द्वारकेला त्यांनी स्वतःतं निवासस्थान केलं आणि सोमनाथाजवळच्या प्रभास येते त्यांनी शरीर सोडलं. खरं तर श्रीकृष्ण याच प्रभास क्षेत्रात आपल्या वंशाचा अंत झालेला पाहून दुःखी झाले होते. तेव्हापासूनच ते तिथे राहू लागले.

एके दिवशी ते एका झाडाखाली विश्रांती करत होते. तेव्हाच एका पारध्याने त्यांना हरीण समजून बाण मारला. हा बाण त्यांच्या पायाला जाऊन लागला, तेव्हाच त्यांनी देहत्याग करायचा निर्णय घेतला. लोकं सांगतात त्याच्यानुसार त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांचे केस पांढरे झाले नव्हते किंवा त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्याही नव्हत्या.  अर्थात, ११९ वर्षांचे होऊनही प्रभू श्रीकृष्ण चिरतरूण होते.