Get it on Google Play
Download on the App Store

कृष्णाची द्वारका

प्रभू श्रीकृष्णाने गुजरातच्या किनाऱ्यावर आपल्या पुर्वजांच्या भूमीवर एक भव्य नगरी वसवली होती. काही विद्वानांच्या सांगण्याप्रमाणे त्याने आधीच ओस पडलेल्या कुशस्थळीचा जिर्णोद्धार केला होता. असं मानलं जातं की श्रीकृष्ण त्यांच्या आयुष्याची शेवटची काही वर्ष सोडली तर द्वारकेत कधीच सहा महिन्यापेंक्षा जास्त काळ राहिले नाही.
 
श्रीकृष्णाच्या ही नगरी विश्वकर्मा आणि मयदानव या दोघांनी मिळून बनवलं होतं. विश्वकर्मा हे देवांचे आणि मयदानव हे असुरांचे अभियांत्रिक म्हणजेच इंजिनिअर होते.  हे दोघे रामाच्या काळातही होते. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार द्वारका बुडण्याच्या आधी नष्ट केली गेली होती. पण “कोणी नष्ट केलं असेल द्वारकेला?” हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे. समुद्रात अजुनही द्वारकेचे काही अवशेष सापडले आहेत. तिथे जी भांडी सापडली आहेत ती इ.स.पूर्व १५२८ ते इ.स. पूर्व ३००० मधल्या काळातली आहेत असं म्हटलं जातं.