Android app on Google Play

 

उषा

 

उषाला सकाळची देवी मानले गेले आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रकाशाला उषा म्हटले जाते. अनेक वेळा चांदण्यांच्या विशिष्ट अर्थासाठी देखील या शब्दाचा उपयोग होतो. ऋग्वेदात उषा हिला द्यौ ची कन्या म्हटलेले आहे.
द्यौ (आकाश) ला ऋग्वैदिककालीन देवांमध्ये सर्वांत प्राचीन मानले जाते. पृथ्वी देखील द्यौवा आणि पृथ्वी या नावांनी ओळखली जात होती. आकाशाला सर्वश्रेष्ठ देवता आणि सोम ला वनस्पती देवता या रुपांत मानले जाई.
रात्र, अंधार, प्रकाश आणि मृत्यू यांचा उषाशी जवळचा संबंध आहे आणि हा संबंध स्वाभाविक रूपाने सविता आणि सावित्री यांच्याशी देखील जोडलेला आहे.