Get it on Google Play
Download on the App Store

गंगा देवी

https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/d1/2a/91/d12a917e290cf37635d8b4d7cae1213d.jpg

गंगा पर्वतांचा राजा हिमवान आणि त्याची पत्नी मीना यांची दुसरी कन्या होती. अशा प्रकारे ती माता पार्वतीची बहीण होती. तिचे पालन पोषण स्वर्गात ब्रम्हदेवाच्या संरक्षणात झाले होते. याच देवीच्या नावावर एका नदीचे नाव गंगा असे ठेवण्यात आले होते. गंगा नदी देखील स्वर्गातील (हिमालयाचे एक क्षेत्र) नदी होती जिला राजा भगीरथ याच्या अथक प्रयत्नांनी धरतीवर आणण्यात आले होते.
गंगा देवीला मकर नावाच्या वाहनावर बसून नदीत विहार करणारी देवी मानले गेले आहे, जी प्राचीन काळी गंगा नदीत विहार करत असे. गंगा एकमेव अशी नदी आहे, जी तिन्ही लोकांत वाहते - स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, म्हणूनच संस्कृत भाषेत तिला 'त्रिपथगा' (तिन्ही लोकांत वाहणारी) म्हटले जाते.
स्कंद पुराणानुसार देवी गंगा कार्तिकेय (मुरुगन) ची सावत्र आई आहे. कार्तिकेयाला शिव आणि पार्वतीचा पुत्र मानले गेले आहे. एका मान्यतेनुसार पार्वतीने आपल्या शारीरिक दोषांपासून जेव्हा गणेश उत्पन्न केला होता तेव्हा गंगेच्या पवित्र पाण्यात बुडवून काढल्यावरच तो जिवंत झाला होता. उल्लेखनीय आहे की भीष्म देखील गंगेचे पुत्र होते. प्रत्यक्षात भीष्म ८ वासुगणांपैकी एक द्यौस होते, जे एका शापाच्या प्रभवमुलोए मनुष्य योनीत गंगेच्या गर्भातून जन्माला आले होते.