Android app on Google Play

 

गायत्री

 

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/b/b4/Gayatri1.jpg

गायत्री नावाने ऋग्वेदात एक सर्वांत मोठा छंद आहे. गायत्रीला आद्यशक्ती प्रकृतीच्या ५ रूपांपैकी एक मानले गेले आहे. तिलाच वेद माता म्हणतात. एका वेळी ती सविता देवाच्या कन्येच्या रुपात अवतीर्ण झाली होती त्यामुळे तिचे नाव सावित्री पडले. तिचा विग्रह तापलेल्या सुवर्णाच्या समान आहे. वेदांमध्ये अदिती व्यतिरिक्त सविताचा देखील अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो.
पद्म पुराणानुसार वाज्रनाश नावाच्या एका दानवाचा वाढ केल्यानंतर ब्रम्हदेवाने सृष्टीच्या भल्यासाठी पुष्कर मध्ये एक यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञ करण्यासाठी ब्रम्हदेव पुष्कर इथे पोचले, परंतु काही कारणाने सावित्री वेळेवर पोहोचू शकली नाही. यज्ञ संपन्न करण्यासाठी त्यांच्या सोबत त्यांची पत्नी असणे आवश्यक होते. परंतु सावित्री न आल्यामुळे त्यांनी एक कन्या गायत्री हिच्याशी विवाह करून यज्ञाला सुरुवात केली.
त्याच द्दर्म्यान देवी सावित्री तिथे पोचली आणि ब्रम्हदेवाच्या शेजारी दुसरी स्त्री बसलेली पाहून क्रोधीत झाली. तीत्ने ब्रम्हदेवाला शाप दिला की देवता असून देखील तुमची कधीही पूजा केली जाणार नाही. तेव्हा सर्व देवतांनी मिळून सावित्रीला विनंती केली की तुम्ही तुमचा शाप परत घ्या, पण तिने शाप परत घेतला नाही. जेव्हा राग शांत झाला तेव्हा सावित्रीने सांगितले की फक्त पुष्कर मध्ये तुमची पूजा होईल.