Get it on Google Play
Download on the App Store

शचि

http://vedicgoddess.weebly.com/uploads/3/1/4/3/3143584/7895597.jpg

स्कंद पुराणाच्या पुलोमा पुत्री शची हिचा वेदांमध्ये देखील उल्लेख मिळतो. स्कंद पुराणानुसार सतयुगात दैत्यराज पुलोमा ची कन्या शची हिने देवराज इंद्र याला पती रुपात मिळवण्यासाठी ज्वालपाधाम मध्ये हिमालयाची अधिष्ठात्री देवी पार्वती हिची तपश्चर्या केली होती. तिच्या तपाने प्रसन्न होऊन माता पार्वतीने तिला दिप्त ज्वालेश्वरी च्या रुपात दर्शन दिले आणि तिची मनोकामना पूर्ण केली. जिथे मातेने दर्शन दिले होते ते स्थान उत्तराखंड च्या गाढवाल क्षेत्रात आहे. इथे माता ज्वालादेवी चे एक मंदिर आहे.

देवी शचीला इंद्राणी म्हटले जाते. इंद्राणीने आपला पती इंद्र याच्या हातात ब्राम्हणांच्या हस्ते रक्षासुत्र बांधले होते. तिने हे अशासाठी केले की त्यावेळी देव-असुर युद्ध चालू होते. रक्षासुत्र बांधून जेव्हा इंद्राने युद्ध केले तेव्हा तो विजयी झाला. काही लोक असे मानतात की तेव्हापासूनच रक्षाबंधन प्रथा सुरु झाली.