Android app on Google Play

 

भूमिका

 

http://previews.123rf.com/images/mkistryn/mkistryn1110/mkistryn111000037/10890280-collage-with-variety-of-asian-religious-symbols-as-Lakshmi-Ganesha-Hanuman-Vishnu-Shiva-Parvati-Durg-Stock-Photo.jpg

देवता' - हा शब्द सर्व धर्मांचा आधार आहे. इंग्रजी मधील शब्द डाईटी (deity) देखील याच देव आणि दैत्य यांच्यापासून बनला आहे. देवतांना सूर आणि दैत्यांना असुर म्हटलेले आहे. काही धर्मांच्या अनुसार हे सूर आणि असुर असे प्रचलित राहिले. हिंदू धर्मातील हे देवी आणि देवता अन्य धर्मांमध्ये अन्य रूप आणि रंगांत चित्रित करण्यात आलेले आहेत. वरून आणि शिव नावाचे देवता सुरे आणि असुर दोघांमध्ये सर्वमान्य मानले गेलेले आहेत. सत्यावर जर का विरोधाभासाचे आवरण चढलेले असेल तर ते असत्य मानले जाते. असे मानले जाते की हिंदू देवी देवतांची संख्या ही ३३ करोड आहे. परंतु हे सत्य नाहीये. वेदांमध्ये हिंदू देवतांची संख्या ३३ कोटी सांगितलेली आहे. 'कोटी' चा अर्थ इथे 'प्रकार' असा आहे, परंतु ही गोष्ट लोकांना सांगणाऱ्या पंडिताने त्याचे करोड करून सांगितले. हा विरोधाभास आणि भ्रम आजपर्यंत कायम आहे. याच प्रकारे हिंदू धर्मात कोणत्याही देवी देवतेची कहाणी एका पुराणात वेगळी आहे तर दुसर्या पुराणात वेगळी. ही पुराणे काही गुप्तकाळात तर काही मध्यकाळात संशोधन करण्यात आली. पुराणांपासून अलग वेद आणि स्मृती जाणून घेतल्या पाहिजे.