Android app on Google Play

 

दक्षाच्या कन्या

 

http://1.bp.blogspot.com/-WxOwziUZWto/UrLtjVkEDOI/AAAAAAAAAIY/f7r1Ub_vdmQ/s1600/Kashyapa+with+wives.jpg

भगवान ब्रम्हदेवाच्या मानस पुत्रांपैकी एक असलेला प्रजापती दक्ष याचा पहिला विवाह स्वयंभू मनुची तृतीय कन्या प्रसूती हिच्याशी झाला. प्रसूतीपासून दक्षला २४ कन्या होत्या. दक्ष च्या दुसऱ्या पत्नीचे नाव विरणी होते, जिच्यापासून द्क्ष ला ६० कन्या मिळाल्या. अशा प्रकारे द्क्ष ला ८४ कन्या होत्या. समस्त दैत्य, गंधर्व, अप्सरा, पक्षी, पशु सर्व सृष्टी या कन्यांपासूनच उत्पन्न झाले. दक्षाच्या या सर्व कन्याना देवी, यक्षिणी, पिशाच्चिनी म्हटले गेले.या कन्या आणि त्यांच्या कन्यांनाच कोणत्या ना कोणत्या रुपात पूजले जाते. सर्वांच्या वेगवेगळ्या कथा आहेत.