Android app on Google Play

 

सावित्री

 

http://www.indianetzone.com/photos_gallery/89/1_Goddess_Savitri.jpg

ब्रम्हदेवाच्या पत्नीचे नाव सावित्री आहे. ब्रम्हदेवाने आणखी एका स्त्रीशी विवाह केला होता जिचे नाव गायत्री आहे. सावित्रीच्या एका कन्येचे नाव सरस्वती आहे.
एक दुसरी सावित्री देखील इतिहासात प्रसिद्ध आहे, जी राजकुमार सत्यवान याची पत्नी होती आणि मद्रदेशाची राजकुमारी होती. वटसावित्री हे व्रत याच सत्यवानाची पत्नी सावित्री हिच्या नावाने होते. मद्रदेशाच्या राजाला ही कन्या ब्रम्हदेवाची पत्नी सावित्री हिची आराधना केल्यानंतर प्राप्त झाली होती. म्हणून त्याने तिचे नाव सावित्री ठेवले. ही सावित्री म्हणजे जिने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणून  त्याला पुन्हा जिवंत केले होते.