Android app on Google Play

 

माता दुर्गा

 

ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या बाबतीत हिंदू मानस पटलांवर भ्रमाची स्थिती आहे. हिंदू लोक त्यांनाच सर्वोत्तम आणि स्वयंभू मानतात. परंतु हे खरे आहे का? ब्रम्हा, विष्णू आणि महेशाचे कोणीही पिता नसतील? वेदांमध्ये लिहिलेले आहे की जो जन्माला आला किंवा प्रकट झाला तो ईश्वर होऊ शकत नाही. ईश्वर अजन्म, अप्रकट आणि निराकार आहे. कालांतराने दुर्गामातेला माता पर्वतीशी जोडून ९ रुपात तिची पूजा केली जाऊ लागली. त्या ९ रूपांची नावे आहेत -
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री.


प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति.चतुर्थकम्।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति.महागौरीति चाष्टमम्।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना:।।

http://www.astrogems.com/wallpapers/sri-durga/E37_2.jpg

शिव पुराणानुसार त्या अविनाशी परब्रम्हाने (काल) काही काळानंतर अद्वितीय इच्छा प्रकट केली. त्याच्या अंतरात एकपासून अनेक होण्याचा संकल्प उदयाला आला. तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपली लीला आणि शक्तीने आकाराची कल्पना केली, जो मुर्तीरहित परम ब्रम्ह आहे. परम ब्रम्ह अर्थात एकाक्षर ब्रम्ह. परम अक्षर ब्रम्ह. ते परम ब्रम्ह भगवान सदाशिव आहे. एकाकी राहून स्वेच्छेने सर्व दिशांना विहार करणाऱ्या त्या सदशिवाने आपल्या विग्रहाने (शरीर) शक्तीची सृष्टी केली, जी त्यांच्या स्वतःच्या श्री अंगापासून कधीही वेगळी होणार नव्हती. सदशिवाच्या त्या पराशाक्तीला प्रधान प्रकृती, गुणवती माया, बुद्धी तत्वाची जननी आणि विकार रहित सांगण्यात आले आहे.

ती शक्ती अंबिका (पार्वती किंवा सती नव्हे) म्हटली गेली आहे. तिला प्रकृति, सर्वेश्वरी, त्रिदेव जननी (ब्रह्मा, विष्णु और महेश यांची माता), नित्या आणि मूळ कारण देखील म्हणतात. सदाशिव द्वारे प्रकट केल्या गेलेल्या त्या शक्तीला ८ भूजा आहेत.
पराशक्ती जगतजननी अशी ती देवी नाना प्रकारच्या गतीनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारच्या अस्त्र शक्ती धारण करू शकते. एकेकी असूनही ती माया शक्ती संयोगाने अनेक होते. त्या काळरूपी सदाशिवाची अर्धांगिनी आहे दुर्गा.