माता लक्ष्मी
भगवान विष्णुंची पत्नी आणि भृगु ऋषींची कन्या देवी लक्ष्मी हिंदू धर्मातील तीन प्रमुख देविन्पैकी एक आहे. देवी लक्ष्मीला धन आणि समृद्धी देणारी देवता असे मानले गेले आहे. लक्ष्मीचे वाहन घुबड आहे आणि ती लक्ष्मी क्षीरसागरात भगवान विष्णूच्या सोबत कमळावर निवास करते.
आनन्द: कर्दम: श्रीदश्चिक्लीत इति विश्रुत:।
ऋषय श्रिय: पुत्राश्च मयि श्रीर्देवी देवता।। -(ऋग्वेद 4/5/6)
देवी लक्ष्मीला २ रूपांमध्ये पूजले जाते - श्रीरूप आणि लक्ष्मी रूप. तिचा विशेष दिवस शुक्रवार मानला गेला आहे. भगवती लक्ष्मीचे १८ पुत्र सांगितलेले आहेत ज्यामध्ये प्रमुख पुत्र आहेत - आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत.