Get it on Google Play
Download on the App Store

शतरूपा

http://vedicgoddess.weebly.com/uploads/3/1/4/3/3143584/1522613.jpg

वर्तमान विश्वाचा प्रथम मानव स्वयंभू मनु च्या पत्नीचे नाव शतरूपा होते. विश्वातील प्रथम स्त्री असल्या कारणाने तिला जगात जननी देखील म्हटले जाते. तिचा जन्म ब्रम्हदेवाच्या वामांग पासून झाला होता. त्यांना प्रियव्रात, उत्तानपाद इत्यादी 7 पुत्र आणि देवहूति, आकूति तथा प्रसूति नामक 3 कन्या झाल्या होत्या. रामचरित मानस च्या बालकांड मध्ये मनु - शतरूपा च्या तपाचा आणि वरदानच उल्लेख मिळतो.

अभगच्छत राजेन्द्र देविकां विश्रुताम्।
प्रसूर्तित्र विप्राणां श्रूयते भरतर्षभ।। -महाभारत

वितस्ता नदीची शाखा देविका नदीच्या तटावर मनु आणि शतरूपा यांची उत्पत्ती झाली होती. वर्तमानात ती नदी काश्मीर मध्ये वाहते. शातारूपाचे पुत्र उत्तानपाद च्या सुरुची आणि सुनीती नावाच्या दोन पत्नी होत्या. राजा उत्तानपाद यांना सुनीती पासून ध्रुव आणि सुरुची पासून उत्तम असे पुत्र होते. ध्रुवाने खूप प्रसिद्धी प्राप्त केली होती. स्वयंभू मनूचा दुसरा पुत्र प्रीयवत याने विश्वकर्माची कन्या बहिर्ष्मती हिच्याशी विवाह केला होता ज्यातून आग्नीध्र, यज्ञबाहु, मेधातिथि इत्यादी 10 पुत्र उत्पन्न झाले. प्रीयावत याला दुसऱ्या पत्नीपासून उत्तम, तामस आणि रैवत - हे 3 पुत्र उत्पन्न झाले, जे आपल्या नावाच्या मन्वंतराचे अधिपती झाले. महाराज प्रियवत च्या १० पुत्रांपैकी कवी, महावीर आणि सवन हे ३ नैष्ठिक ब्रम्हचारी होते आणि त्यांनी संन्यासी धर्म ग्रहण केला होता.