Get it on Google Play
Download on the App Store

नैनो टेक्नालाजी(नैनो अंतराळ यान)



कोणतीही परग्रही संस्कृती जी अंतराळात यान पाठवू शकते तिला नेनो तंत्रज्ञानाचे ज्ञान नक्कीच असणार. याचाच अर्थ असा की त्यांची याने ही आकाराने मोठी असण्याची काहीही आवश्यकता नाही. नेनो अंतराळ याने लाखोंच्या संख्येने अंतराळात ग्रहांवरील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी पाठवता येऊ शकतात. ग्रहांचे उपग्रह अशा नेनो अंतराळ यानांसाठी आधार केंद्र असू शकतात. जर असे असेल तर या आधीच वर्ग ३ ची संस्कृती आपल्या चंद्राचा प्रवास करून गेलेली असणार. हे देखील शक्य आहे की ही याने स्वयंचलित किंवा रोबोटिक असतील आणि आजही चंद्रावर उपस्थित असतील. मानव संस्कृतीला चंद्रावरची अशी नेनो याने शोधण्यासाठी सक्षम होण्याला अजून किमान १०० वर्षे तरी लागतील. जर अशी संस्कृती आपल्या चंद्राचा प्रवास करून गेली असेल किंवा त्यांच्या यानांचे आधार केंद्र जर चंद्रावर असेल की यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही की उडत्या तबकड्या आकाराने विशालकाय नसतात. केवळ या तबकड्या विशालकाय प्रणोदन प्रणाली च्या design प्रमाणे नसल्यामुळे काहीवैज्ञानिक त्यांना अफवा मानतात. त्यांच्या मते अंतराळ यात्रेसाठी विशालकाय प्रणोदन प्रणाली आवश्यक आहे ज्यामध्ये रैमजेट संलयन इंजीन, विशालकाय लेजरचालित पाल तथा नाभिकिय पल्स इंजिन आहे जे कित्येक किलोमीटर मोठे असू शकेल. परंतु जर चंद्रावर त्यांचे आधार केंद्र असेल तर ती याने छोटी असू शकतात आणि चंद्रावरील आधार केंद्रातून ती इंधन घेत असावीत.
उडत्या तबकड्यांच्या घटना म्हणजे चंद्रावरील आधार केंद्रातून आलेली स्वयंचलित याने असू शकतील.

अंतराळातील जीवन-सत्य कि असत्य?- भाग २

passionforwriting
Chapters
उपग्रहांचे प्रक्षेपण केप्लर अंतराळ वेधशाला टेरेस्ट्रीयल प्लेनेट फाईण्डर ते कसे दिसत असतील? बुद्धिमान जीवनासाठी आवश्यक असलेले गुणधर्म मानवाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त बुद्धी कशासाठी आहे? हॉलीवूड ची कल्पना परग्रही जीवांचा आकार अनुपाताचा का सिद्धांत आकाशगंगा आणि परमाणु संरचना परग्रही संस्कृती मध्ये वैज्ञानिक विकास कार्दाशेव चे अनुमान आणि पृथ्वी ची संस्कृती परग्रही संस्कृतींचे पृथ्वीवर आक्रमण उडत्या तबकड्या उडत्या तबकड्यांचा भास तपास आणि पुरावे एकध्रुविय चुंबक नैनो टेक्नालाजी(नैनो अंतराळ यान) ब्रम्हांडाचे विशालकाय अंतर परग्रही जीवन आणि भविष्य