Android app on Google Play

 

ते कसे दिसत असतील?

 


आपल्या डोळ्यासमोर परग्रही लोकांचे जे काही आकार किंवा चित्र आहे ते सर्व हॉलीवूड च्या चित्रपटांतील आहेत. विविध हॉलीवूड चित्रपट जसे एम आय बी,  एलीयन,  स्पीसीज अशा चित्रपटात परग्रही हे मानवासारख्या आकाराचे किंवा किड्यान्सारखे दाखवलेले आहेत. हे चित्रपट पाहून आपल्या मनात परग्रही हे असेच दिसत असणार असे बसले आहे.परग्रही जीवनाची सममिती
शास्त्रज्ञांनी भौतिक, जैविकी आणि रसायन विज्ञानाच्या नियामंच्चे निकष लावून हे अनुमान लावण्याचा प्रयत्न केलेला आहे की परग्रहावरील जीव कसे दिसत असतील? न्यूटन ला आश्चर्य वाटत असे की आपल्या आसपास दिसणारे सर्व प्राणी पक्षी हे द्विपक्षीय  सममिती वाले आहेत, दोन डोळे, दोन हात, दोन पाय इत्यादी एका सामामितीत. हा योगायोग आहे की देवाची कारणी?

जैविक शास्त्रज्ञ मानतात की अर्धा अब्ज वर्षांपूर्वी कैम्ब्रीयन विस्फोटाने सृष्टीने अनेक आकारांचे छोटे विकास शील प्राणी निर्माण केले होते. या दरम्यान सृष्टीने जैविक सममिती वर अनेक प्रयोग केले होते. त्यातील काही मणके x,y,z अशा आकारांचेही होते. काहींची तारा माशासारखी सममिती देखील होती. एका प्राण्याचा मणका I सारखा होता आणि द्विपक्षीय सममिती होती जो आजच्या अधिकांश सस्तन प्राण्यांचा पूर्वज आहे. या प्रयोगातील काही जीव लुप्त झाले तर काही अजूनही आहेत. हॉलीवूड मधले चित्रपट निर्माते मानवासारखे द्विपक्षीय सममिती असलेल्या आकाराचे प्राणीच परग्रही म्हणून दाखवतात, परंतु हा आकार काही सर्वच बुद्धिमान प्राण्यांसाठी आवश्यक नाही. परग्रही जीवन काही अन्य सममितीचे देखील असू शकते.

काही जैविक वैज्ञानिक मानतात की कैम्बरीयन विस्फोटाच्या दरम्याने विभिन्न प्रकार्च्याच्या प्राणी आणि आकारांची उत्पत्ती शिकारी आणि सावज यांच्या मध्याची एक स्पर्धा होती. आधी दुसऱ्या जीवना भोजन बनवणाऱ्या बहुकोषीय जीवनाच्या उत्पत्तीने दोन्ही जीवनाच्या क्रमिक विकासाला गती दिली, ज्यामध्ये प्रत्येक जीवन दुसऱ्यापेक्षा प्रगत होण्याच्या स्पर्धेत लागले. हे शीतयुद्ध अमेरिका आणि रशिया यांच्यातील युद्धाप्रमाणे होते, प्रत्येक पक्ष दुसऱ्याला मागे टाकायला बघत होता. 

अंतराळातील जीवन-सत्य कि असत्य?- भाग २

passionforwriting
Chapters
उपग्रहांचे प्रक्षेपण
केप्लर अंतराळ वेधशाला
टेरेस्ट्रीयल प्लेनेट फाईण्डर
ते कसे दिसत असतील?
बुद्धिमान जीवनासाठी आवश्यक असलेले गुणधर्म
मानवाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त बुद्धी कशासाठी आहे?
हॉलीवूड ची कल्पना
परग्रही जीवांचा आकार
अनुपाताचा का सिद्धांत
आकाशगंगा आणि परमाणु संरचना
परग्रही संस्कृती मध्ये वैज्ञानिक विकास
कार्दाशेव चे अनुमान आणि पृथ्वी ची संस्कृती
परग्रही संस्कृतींचे पृथ्वीवर आक्रमण
उडत्या तबकड्या
उडत्या तबकड्यांचा भास
तपास आणि पुरावे
एकध्रुविय चुंबक
नैनो टेक्नालाजी(नैनो अंतराळ यान)
ब्रम्हांडाचे विशालकाय अंतर
परग्रही जीवन आणि भविष्य