एकध्रुविय चुंबक
या समस्येवर एक उपाय म्हणजे एक ध्रुवीय चुंबक आहे. म्हणजे असे चुंबक ज्याचा एकाच ध्रुव असेल, उत्तर किंवा दक्षिण. सामान्यतः एखाद्या चुंबकाला मधीमध तोडले तर दोन एकध्रुव चुंबके बनत नाहीत, तर दोन्ही तुकडे दोन दोन ध्रुव घेऊन द्वी ध्रुवीय चुंबके बनतात. त्यामुळे आपण एखाद्या चुम्बकाचे कितीही तुकडे केले तरी प्रत्येक तुकडा हा दोन धृवांचाच बनेल. असे परमाणु स्तरावर पोचेपर्यंत होईल, परमाणु स्तर स्वतः द्विधृवीय आहे.
वैज्ञानिकांच्या समोर समस्या आहे की एक ध्रुवीय चुंबक प्रयोग्शालेल्त कधीही पाहण्यात आलेले नाही. भौतिक शास्त्रज्ञांनी आपल्या उपकरणांच्या सहाय्याने एक ध्रुवाच्या चुंबकाचे चित्र घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ते अयशस्वी झाले आहेत. (१९८२ मध्ये स्टैनफोर्ड विश्व विद्यालय इथे घेण्यात आलेले एक अत्यंत वादग्रस्त छायाचित्र याला अपवाद आहे.)
एकध्रुवी चुंबक प्रयोगशाळेत पाहण्यात आलेले नाही परंतु भौतिक शास्त्रज्ञ असे मानतात की ब्रम्हांडाच्या जन्मानंतर लगेचच एकध्रुवी चुंबक मुबलक प्रमाणात उपलब्ध राहिले असणार. ही धारणा ब्रम्हांडाच्या उत्पत्तीच्या महाविस्फोट (Big Bang) वर आधारित सिद्धांतावर आधारित आहे. एकध्रुवी चुंबकाचे घनत्व ब्रम्हांडाच्या विस्तारासोबत कमी होत गेले, आणि आज ते दुर्मिळ झालेले आहे. खरे सत्य हे आहे की एकध्रुवी चुंबक दुर्मिळ झाल्यामुळेच वैज्ञानिक विस्तृत होणाऱ्या ब्रम्हांडाच्या सिद्धांताच्या प्रतिपादनाला प्रोत्साहित झाले आहेत. त्यामुळेच सैद्धांतिक रूपाने एक धृवी चुंबकाचे अस्तित्व भौतिकात आधीपासूनच संभव आहे.
असे मानता येईल की अंतराळ यात्रेत सक्षम परग्रही प्रजाती महाविस्फोटा नंतर उरलेल्या मौल्यवान एकध्रुवी चुम्बकाना अंतराळात एका मोठ्या चुंबकीय जाळ्यात जमवून आपल्या प्रयोगासाठी घेऊन जाऊ शकतील. आणि एकदा त्यांच्या जवळ अपेक्षित साठ तयार झाला की ते अंतराळात पसरलेल्या चुंबकीय रेषांवर आरामात सावर होऊन कुठेही प्रवास करू शक्क्तात.