टेरेस्ट्रीयल प्लेनेट फाईण्डर
टेरेस्ट्रीयल प्लेनेट फाईण्डर ज्याला २०१४ मध्ये प्रक्षेपित केले जाणार होते, केप्लर अंतराळ वेधशाळेपेक्षा जास्त वैशिष्ट्ये बाळगून आहे. हा उपग्रह ४५ प्रकाशवर्ष पर्यंत १०० ताऱ्यांचे जास्त व्यवस्थितपणे निरीक्षण करेल. या उपग्रहावर ग्रहांच्या शोधासाठी दोन उपकरणे असतील. पहिले उपकरण म्हणजे क्रोनोग्राफ आहे जो एक विशेष दुर्बीण आहे, ज्याद्वारे एखाद्या ग्रहाद्वारे त्याच्या मातृ ताऱ्याच्या समोर येण्याने त्याच्या प्रकाशात आलेल्या १०० व्या हिश्श्याच्या कमिला देखीउल जाणून घेऊ शकेल. ही दुर्बीण हब्बल दुर्बिणीपेक्षा ४ पट मोठी आणि १० पात अचूक असेल.दुसरे उपकरण म्हणजे एक इंटरफेरोमिटर आहे जो एखाद्या ग्रहामुळे त्याच्या मातृ ताऱ्याच्या प्रकाश तारांगांमध्ये आलेल्या १० लाखाव्या भागा पर्यंतचे परिवर्तन जाणून घेऊ शकेल. युरोपियन अंतराळ एजन्सी एक आणखी ग्रह शोध उपग्रह "डार्विन" ची योजना बनवत आहे ज्याला २०१५ किंवा त्यानंतर प्रक्षेपित केले जाईल. यामध्ये तीन अंतराळ दुर्बिणी असतील ज्यांचा व्यास ३ मीटर असेल. या तीनही एकत्र असतील आणि एका मोठ्या इंटरफेरोमिटर प्रमाणे काम करतील. त्याचे लक्ष्य देखील पृथ्वी सारखे ग्रह शोधणे हेच असेल.
अंतराळात पृथ्वी सारख्या १०० ग्रहांचा शोध सेटी कडे पुन्हा लक्ष द्यायला लावण्यासाठी पुरेसे असतील. अवकाशात अनियमितपणे ताऱ्यांवर बुद्धिमान जीवन शोधात बसण्यापेक्षा काही निवडक ताऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य ठरेल.