Android app on Google Play

 

हनुमान

 युद्धाच्या पहिल्या दिवशी जेव्हा दिवस मावळत आला होता, तेव्हा रावण लंकेच्या सर्वात उंच शिखरावर रणभूमीची पाहणी करायला गेला. त्याने पाहिले की आपली सेना अस्वल आणि वानरांकडून पराभूत होत आहे. हनुमानाने रावणाला तिथे उभे राहिलेले पहिले आणि एक उंच आणि लांब उडी मारून तो रावणाच्या डोक्यावर जाऊन बसला.
एकदा त्याच्या माथ्यावर पोचल्यावर हनुमान त्याच्या दहाही डोक्यांवर नाचू लागला आणि त्याने रावणाचा मुकुट काढून खाली फेकून दिला. हे पाहून रावणाच्या संपूर्ण सेनेला धक्का बसला आणि त्यांनी शरमेने माना खाली घातल्या. तर दुसरीकडे वानर आणि अस्वलांची सेना हे दृश्य पाहून आनंद साजरा करू लागली. रावणाच्या डोक्यावर नाचण्याचा हा प्रकल्प हनुमानाने दैत्यराज आणि त्याच्या सेनेला हतबल करण्यासाठी केला होता. त्याचा परिणाम म्हणून राक्षस सेनेचे मनोबल खचले. या गोष्टीचा वानर आणि अस्वलांच्या सेनेने फायदा घेतला आणि शेवटी रावणाच्या सेनेला पराभव पत्करावा लागला.