Android app on Google Play

 

रामाचा मृत्यू

 


रामाचा मृत्यूच होत नव्हता कारण हनुमान यमदेवाला अयोध्येत घुसुच देत नव्हता. हनुमानाचे लक्ष विचलित करण्यासाठी रामाने जमिनीतील एका भेगेत आपली अंगठी टाकली आणि हनुमानाला ती अंगठी आणून द्यायला सांगितले. जेव्हा हनुमानाने खाली जाऊन सर्पांच्या राजाकडून रामाची अंगठी मागितली तेव्हा त्या राजाने हनुमानाला अंगठ्यांनी भरलेली एक गुहा दाखवली आणि सांगितले की या सर्व अंगठ्या प्रभू रामाच्या आहेत. हनुमान आश्चर्यचकित झाला. राजाने पुढे सांगितले की जेव्हा जेव्हा कालचक्रात रामाला मृत्यू जवळ करायचा असतो तेव्हा तो एका भेगेतून एक अंगठी खाली टाकतो. जेणेकरून कोणीतरी हनुमान आपल्या पहाऱ्यावरून बाजूला जाईल.