Android app on Google Play

 

जया आणि विजय

 

 

रावण आणि त्याच्या भावाला भगवान विष्णूचे दारवान किंवा द्वारपाल जया आणि विजय यांची रूपे मानलं जातं. जेव्हा ब्रम्हदेवाच्या पुत्रांना विष्णू लोकात प्रवेश दिला गेला नाही तेव्हा त्यांनी जया आणि विजय यांना शाप दिला. जया आणि विजय यांनी मग विष्णूकडे मदतीची धाव घेतली. तेव्हा विष्णूने सांगितले की त्यांच्याकडे दोन मार्ग आहेत. एक तर ते आपल्या भक्ताच्या रुपात ७ जन्म घेऊ शकतील किंवा शत्रूच्या रूपात ३ जन्म घेऊ शकतील. त्यांनी शत्रू बनणे पसंत केले कारण जास्त दिवस ते विष्णूपासून दूर राहू शकत नव्हते. त्यांनी पुढीलप्रमाणे रूपं घेतली - सतयुगात हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप त्रेता युगात रावण आणि कुंभकर्ण द्वापार युगात दंतवक्र आणि शिशुपाल