रामाची बहीण
राम आणि त्याचे बंधू लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या जन्मापूर्वी राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौसल्या यांना शांता नावाची एक मुलगी होती. कौसल्येची मोठी बहीण आणि तिचे पती राजा रोमपाड यांना मूल नव्हते. जेव्हा वेर्शिणी अयोध्येला आली तेव्हा तिने दशराथाकडे एका संतानाची मागणी केली, तेव्हा राजा दशरथाने तिला आपली मुलगी शांता ही दत्तक देण्याचे वचन दिले. राघुकुलाचे लोक वचन कधीच मोडू शकत नसत, त्यामुळे राजा रोमपाड ने शांताला दत्तक घेतले. शांता मोठी झाली. एकदा ती राजा रोमपाड यांच्यासोबत गप्पा मारत होती. आणि आपल्या मुलीशी गप्पागोष्टी करण्यात राजा रोमपाड एवढा व्यस्त होता की त्याच्याकडून एका मदत मागायला आलेल्या ब्राम्हणाकडे दुर्लक्ष झाले. हे पाहून इंद्रदेव नाराज झाले आणि त्यांनी राजा रोमपाड याला शिक्षा देण्याचे ठरवले. या शापापासून आपला बचाव व्हावा म्हणून राजाने ऋषी रिश्य्सृन्गा यांना पाऊस पाडण्यासाठी यज्ञ करण्यास सांगितले. हा यज्ञ यशस्वी झाला. ऋषींचा सन्मान करण्यासाठी राजा दशरथ आणि राजा रोमपाड यांनी शांताचा विवाह रिश्य्सृन्गा यांच्यासोबत लावून दिला.