Get it on Google Play
Download on the App Store

वाली आणि सुग्रीव



वाली किश्किंदाचा वानर राजा होता आणि सुग्रीव त्याचा भाऊ. तारा ही वालीची पत्नी होती. जेव्हा वाली एका दैत्याशी लढण्यासाठी एका गुहेत गेला तेव्हा त्याने सुग्रीवाला सांगितले की जर मी मारला गेलो आणि बाहेर येऊ शकलो नाही तर त्या दैत्याला या गुहेत बंद करून टाक. बराच वेळ वाली बाहेर आला नाही, आणि गुहेतून रक्त वहात बाहेर आले. सुग्रीवाला वाटले की आपला बंधू मारला गेला आणि हे त्याचेच रक्त आहे. अत्यंत दुःखी होऊन त्याने एका भल्या मोठ्या दगडाने गुहेचे तोंड बंद करून टाकले आणि तो तिथून निघून गेला. परंतु वाली प्रत्यक्षात जिंकला होता. तो जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने पहिले की त्याच्या जागी त्याचा भाऊ सुग्रीव राज्य करत आहे. त्याला वाटले की राज्य प्राप्तीसाठी सुग्रीवाने आपल्याला धोका दिला आणि गुहेत बंद केले. त्याने सुग्रीवाचे कोणतेही म्हणणे ऐकले नाही. त्याला युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा सुग्रीवाने प्रभू श्रीरामांकडे मदत मागितली आणि रामाने वालीला मारले. जेव्हा वाली सुग्रीवाशी लढायला जात होता तेव्हा ताराने त्याला राम सुग्रीवाची मदत करणार असल्याचे सांगितले. लढाईनंतर सुग्रीव विजयी होऊन किश्किंधाचा राजा बनला.
वाल्मिकी रामायणात तारा पुन्हा राणी आणि सुग्रीवाची पत्नी बनली तर कांब रामायणा प्रमाणे सुग्रीव ताराला आई मनात असे. म्हणजे तारा त्याच्या भावाची पत्नी होती त्यामुळे तो तिला आई मनात असे.