Android app on Google Play

 

हनुमान आणि श्रीराम यांचे युद्ध

 हनुमंतानी एकदा प्रभू श्रीराम यांच्या विरुद्ध युद्ध केले होते आणि ते जिंकलेही होते. महर्षी विश्वामित्र यांनी प्रभू श्रीरामाला ययातीचा वध करण्याचा आदेश दिला होता. परंतु ययातीने हनुमानाकडे मदत मागितली आणि आपला प्रतिस्पर्धी कोण आहे हे माहिती करून न घेताच हनुमानाने ययातीला मदत करण्याचे आश्वासन दिले. हनुमानाने या युद्धात कोणतेही हत्यार वापरले नाही, केवळ हात जोडून राम नामाचा जप करत राहिले. प्रभू रामाच्या धनुष्यातून सुटलेल्या बाणांचा हनुमानावर कोणताही परिणाम झाला नाही. शेवटी रामाने पराभव स्वीकारला. विश्वामित्रांनी हनुमानाची अगाध भक्ती पाहून प्रभू रामाला आपल्या आदेशातून मुक्त केले आणि हनुमानाला वीर हनुमान असे नाव दिले.