Android app on Google Play

 

अंजनीचा जन्म

 


असं म्हटलं जातं की अहिल्याला तीन अपत्य होती. परंतु गौतम ऋषींना त्यांच्या जन्मावर संशय होता म्हणून त्यांनी तीनही मुलांना वानर बनवले. त्यामध्ये मुलगी होती हनुमानाची माता अंजनी आणि मुलगे होते वाली आणि सुग्रीव. काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की अहिल्याने आपल्या कन्येला आपले रहस्य लपवून ठेवू न शकल्याबद्दल शाप देऊन वानर बनवले तर दोन्ही पुत्रांना गौतम ऋषींनी शाप दिला होता. हे रहस्य या गोष्टीशी निगडीत होते की गौतम ऋषींचे रूप घेऊन आलेल्या भगवान इंद्र यांच्यासमवेत अहिल्याने रात्र घालवली होती.