Android app on Google Play

 

जेव्हा रावणाने आपला आत्मा लपवून ठेवण्यासाठी दिला

 जेव्हा रावण रामाशी युद्ध करायला निघाला तेव्हा त्याने आपला आत्मा अग्नी नेत्र नावाच्या एका साधूकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिला होता.
युद्धाच्या वेळी राम हैराण झाला कारण त्याचे बाण रावणाला जखमीच करू शकत नव्हते. परंतु रामाच्या एका हितचिंतकाला या गोष्टीचा सुगावा लागला. त्याने रावणाचे रूप घेतले आणि अग्नी नेत्र साधूंकडे जाऊन रावणाचा आत्मा परत मागून आणला. एकदा तो आत्मा सुटल्यानंतर रावणाचा वध करणे एकदम सोपे बनले.