Android app on Google Play

 

परिशिष्ट ४ 2

 

अभिधम्मपिटकांत सात प्रकरणें आहेत. तीं ही:-

१. धम्मसंगणि
२. विभंग
३. धातुकथा
४. पुग्गलपञ्ञत्ति.
५. कथावत्थु
६. यमक
७. पट्टान

या त्रिपिटक ग्रंथावर सिंहल भाषेंत टीका लिहिल्या होत्या. त्यांना अट्ठकथा (अर्थकथा) असें म्हणत. इ. स. च्या पांचव्या शतकाच्या आरंभी बुद्धघोषाचार्यांनी ह्या अठ्ठकथाचें पालिभाषेंत रुपांतर केलें. दीघनिकायादि चार नीकायांच्या अद्दकथांच्या आरंभी प्रस्तावनेंत खालील गाथा आढळतात.:-

सीहलदीपं पन आभथाथ वसिंना महामहिन्देन ।
ठपिता सीहलभासाय दीपवासिनमत्थाथ ।।
अपनेत्वा ततोहं सीहलभासं मनोरमं भासं ।
तन्तिनयानुच्छविकं आरोपेन्तो विगतदोसं ।।


(ही अठ्ठकथा) महामहिन्दानें सिंहलद्वीपास आणली, आणि (या) द्वीपवासी जनांच्या हितासाठी सिंहलभाषेंत लिहून ठेविली .
बु.१०

ती सिंहलभाषेंतून काढून मनोरम आणि शास्त्रास अनुकूल अशा निर्दोश पालिभाषेंत ठेवतो. ( ठेवणार मी.)

ह्या अठ्ठकथांची नांवे येणे प्रमाणें –

१. दीघनिकाय अठ्ठकथा – सुमंगलविलासिनी.
२. मज्झिमनिकाय”  - पंपंचसूदनी
३. संयुत्तनिकाय अठ्ठकथा – सारत्थप्पकासिनी.
४. अंगुत्तरनिकाय “ – मनोरथपूरणी
५. विनय अट्ठकथा – समंतपासादिका
६. धम्मासंगणि अठ्ठकथा – अठ्ठसादिनी.
७. विभंग अठ्ठकथा – संमोहविनोदनी.
८. धातुकथा पुग्गपञ्ञत्ति,


कथावत्थु, यमक व पठ्ठान या पांच प्रकरणांची अट्ठकथा – पंचप्पकरणट्ठकथा. खुद्दकनिकायांतील प्रकरणांवर निरनिराळ्या आचार्यानी अठ्ठकथा लिहिल्या आहेत.

सुत्तपिटकांत विशेषत: बुद्ध आणि बुद्धाचे प्रमुख शिष्य यांच्या उपदेशाचा संग्रह केला आहे; विनयपिटकांत भिक्षूंनीं पाळण्याच्या नियमांचा संग्रह केला आहे; आणि अभिधम्मपिटकांत बौद्ध तत्त्वज्ञानाचा विस्तारानें विचार केला आहे.
 

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी
Chapters
बुद्ध व बुद्धधर्म 1
बुद्ध व बुद्धधर्म 2
बुद्ध 1
बुद्ध 2
बुद्ध 3
बुद्ध 4
बुद्ध 5
बुद्ध 6
बुद्ध 7
बुद्ध 8
बुद्ध 9
बुद्ध 10
बुद्ध 11
बुद्ध 12
बुद्ध 13
धर्म 1
धर्म 2
धर्म 3
धर्म 4
धर्म 5
धर्म 6
धर्म 7
धर्म 8
धर्म 9
धर्म 10
धर्म 11
धर्म 12
धर्म 13
धर्म 14
धर्म 15
धर्म 16
संघ भाग १ला 1
संघ भाग १ला 2
संघ भाग १ला 3
संघ भाग १ला 4
संघ भाग १ला 5
संघ भाग १ला 6
संघ भाग १ला 7
संघ भाग १ला 8
संघ भाग १ला 9
संघ भाग १ला 10
संघ भाग १ला 11
संघ भाग १ला 12
संघ भाग १ला 13
संघ भाग २ रा 1
संघ भाग २ रा 2
संघ भाग २ रा 3
संघ भाग २ रा 4
संघ भाग २ रा 5
संघ भाग २ रा 6
परिशिष्ट १ 1
परिशिष्ट १ 2
परिशिष्ट १ 3
परिशिष्ट १ 4
परिशिष्ट २ 1
परिशिष्ट २ 2
परिशिष्ट ३ 1
परिशिष्ट ३ 2
परिशिष्ट ३ 3
परिशिष्ट ४ 1
परिशिष्ट ४ 2