परिशिष्ट १ 2
छंदा दोसा भया मोहा, यो धम्मं नातिवत्तति।
आपूरति यसो तस्स जुण्हपक्खेव चन्दिमा।।
जो छंद, द्वेष, मोह किवा भय यांमुळें धर्माचें अतिक्रमण करित नाहीं, त्याचें यश शुक्रपक्षांतील चन्द्राप्रमाणें वाढत जातें.
“आतां संपत्तिनाशाची सहा द्वारें कोणतीं तें सांगतों. (१)सुरादि मादक पदार्थांचे सेवन; (२) अवेळीं बाहेर भटकणें: (३) नाटक तमाशे पाहण्याचें व्यसन; (४) जुगार खेळणें; (५) पापमित्रांची संगति आणि (६) आळस. ह्या सहा संपत्तिनाशाच्या द्वारांचें त्यानें सेवन करतां कामा नये.
“हे गृहपतिपुत्र। धनाशा नाश करणारी, कलह वाढविणारी, रोगाचें माहेरघर, अकीर्तीची आई, लज्जेचा विध्वंस करणारी आणि प्रज्ञेला दुर्बल करणारी अशी ही सुरा आहे. ह्या वारूणीच्या नादाला जो लागला तो लवकरच आपला नाश करून घेतो.
“अवेळीं बाहेर हिंडण्याची ज्याला संवय लागली त्याच्या हातानें स्वतःचें संरक्षण होत नाहीं; मुलांबाळांचेंहि संरक्षण होत नाहीं; संपत्तीचें रक्षण त्याजकडून होत नाहीं. तो रात्रंदिवस साशंक असतो; खोटें बोलण्याची त्याला संवय लागते. पुष्कळशीं शंकटे तो आपल्यावर ओढून घेतो.
“नाटकतमाशांचे ज्याला व्यसन लागलें तो आज कोठें नाच कोठे गायन, कोठें तमाशा आहे त्याच्या चौकशीला लागतो आणि गृहकृत्यें करण्याला त्याला मुळींच सवड मिळत नाहीं.
“जुगार्याला जुगारांत जर पैसा मिळाला तर त्या पैशाबरोबरच तो दुसर्याचें वैर संपादन करतो. त्यांत पैसा घालविला तर त्याचा तो शोक करित बसतो. जुगार्याच्या वचनावर कोणी विश्वास ठेवित नाहीं. आप्त इष्ट त्याचा तिरस्कार करतात. जुगारी तरूणास ‘हा काय जुगारडा बायकोला पोसणार ?’ असें ह्मणून कोणी मुलगी देत नाहीं.
“पापमित्राची ज्याला संगत घडली त्याला जुगारी, मद्यपी, चोर, ठक या सर्वांची क्रमाक्रमानें संगत घडते आणि अशा प्रकारचे मित्र त्याच्या नाशास कारण होतात.
“आळशी मनुष्य ‘आज फार थंडी आहे’ ह्मणून काम करित नाहीं. ‘आज फार ऊन पडलें आहे’ ह्मणून काम करित नाहीं. आज सांज फार झाली’ ह्मणून काम करित नाहीं. ‘आज भूक लागली आहे. ह्मणून काम करित नाहीं. ‘आज फार थकवा आला आहे’ ह्मणून काम करित नाहीं. अशा प्रकारें आळस केल्यामुळें त्याला नवीन तर कांहीं प्राप्ति होत नाहींच, पणं मिळालेले. धन मात्र नाश पावतें.