Android app on Google Play

 

बुद्ध 7

 

बुद्ध भगवान् ह्मणतात:-

तं मं पधानपहितत्तं नदिं नेरंजरं पति।
विपरक्कम्म झायन्तं योगक्खेमस्स पत्तिया ।।१।।
नमुचि करूणं वाचं भासमानो उपागमि।
किसो त्वमसि दुब्बण्णो सन्तिके मरणं तव ।।२।।
सहस्सभागो मरणस्स एकंसो तव जीवितं।
जीवं भो जीवितं सेय्यो जीवं पुञ्ञानि काहसि।।३।।
चरतो च ते ब्रह्मचरियें अग्गिहुत्तंच जूहतो।
पहूतं चीयते पुञ्ञं कि पधानेन काहसि।।४।।


(१) “मी नेरंजरा नदीच्या कांठीं निर्वाणप्राप्तीसाठीं मोठया उत्साहानें ध्यान करीत होतों, माझें सर्व चित्त निर्वाणाकडे लागलें होतें.
(२) (असें असतां) मार माझ्याजवळ आला आणि करूणामय वाणीनें मला ह्मणांला,तूं कृश झाला आहेस, तुझी अंगकांति फिकट झाली आहे, मरण तुझ्याजवळ आहे.
(३) हजार हिश्शांनीं तूं मरणार, एका हिश्शानें काय तें तुझें जीवित बाकी राहिलें आहें. भो(गौतम), जीवंत रहा. जगलास तर पुण्यकर्में करूं शकशील.
(४)(गृहस्थधर्माला विहित) कर्मांचें आचरण करुन, अग्रिहोत्र ठेवून, होम  केला असतां पुष्कळ पुण्य संपादितां येतें, तर मग हें निर्वाण घेऊन काय करायाचें आहें?

मारानें बोधिसत्वाला असा उपदेश केल्यावर बोधिसत्व त्यास ह्मणाला:-

अणुमत्तेनपि पुञ्ञेन अत्थो मह्मं न विज्जति।
येसं च अत्थो पुञ्ञानं ते मारो वत्तुमरहति।।१।।
अत्थि सद्धा ततो विरियं पञ्ञा च मम विज्जति।
एवं मं पहितत्तंपि किं जीवितमनुपुच्छसि।।२।।

(१) अशा प्रकारचें (लौकिक) पुण्य अणुमात्रहि मला नको आहे. ज्यांना अशा पुण्याची आवश्यकता वाटत असेल त्यांना पाहिजे तर मारानें हा उपदेश करावा.
(२) माझ्या अंगी श्रद्धा आहे, उत्साह आहे आणि प्रज्ञाहि पण आहे. इतकें असतां आणि माझें चित्त स्थिर असतांना सरणाची भीति कशाला घालतोस?

आणखी बोधिसत्व ह्मणाला:-

कामा ते पठमा सेना दुतिया अरति वुच्चति।
ततिया खुप्पिपासा ते चतुत्थी तण्हा पवुच्चति।।१।।
पंचमी थीनमिद्धं ते छट्ठा भीरूपवुच्चति।
सत्तमी विचिकिच्छा ते मक्खो थंभो ते अठ्ठमो।।२।।
लाभो सिलोकों सक्कारो मिच्छा लद्धो च ये यसो।
यो चत्तानं समुक्कंसे परे च अवजानति ।।३।।
एसा नमुचि ते सेना कण्हस्साभिप्पहारणी।
न तं असूरो जिनाति जेत्वा च लभते सुखं।।४।।
 

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी
Chapters
बुद्ध व बुद्धधर्म 1
बुद्ध व बुद्धधर्म 2
बुद्ध 1
बुद्ध 2
बुद्ध 3
बुद्ध 4
बुद्ध 5
बुद्ध 6
बुद्ध 7
बुद्ध 8
बुद्ध 9
बुद्ध 10
बुद्ध 11
बुद्ध 12
बुद्ध 13
धर्म 1
धर्म 2
धर्म 3
धर्म 4
धर्म 5
धर्म 6
धर्म 7
धर्म 8
धर्म 9
धर्म 10
धर्म 11
धर्म 12
धर्म 13
धर्म 14
धर्म 15
धर्म 16
संघ भाग १ला 1
संघ भाग १ला 2
संघ भाग १ला 3
संघ भाग १ला 4
संघ भाग १ला 5
संघ भाग १ला 6
संघ भाग १ला 7
संघ भाग १ला 8
संघ भाग १ला 9
संघ भाग १ला 10
संघ भाग १ला 11
संघ भाग १ला 12
संघ भाग १ला 13
संघ भाग २ रा 1
संघ भाग २ रा 2
संघ भाग २ रा 3
संघ भाग २ रा 4
संघ भाग २ रा 5
संघ भाग २ रा 6
परिशिष्ट १ 1
परिशिष्ट १ 2
परिशिष्ट १ 3
परिशिष्ट १ 4
परिशिष्ट २ 1
परिशिष्ट २ 2
परिशिष्ट ३ 1
परिशिष्ट ३ 2
परिशिष्ट ३ 3
परिशिष्ट ४ 1
परिशिष्ट ४ 2