संघ भाग १ला 2
या साठ भिक्षूंना बुद्धानें स्वत: दीक्षा दिली होती ‘एहि भिक्षू’ ह्या बुद्धोक्त वाक्यानेंच त्या वेळीं प्रव्रज्याविधि होत असे. परंतु जेव्हां हे भिक्षू चोहोंकडे पाठविण्यांत आले, तेव्हांपासून नवीन भिक्षूंची संख्या वाढत चालली. दूरच्या प्रदेशांतून भिक्षूसंघांत प्रवेश करण्याची इच्छा करणार्यांना बुद्धाजवळ घेऊन जाणें कठीण पडूं लागलें. ह्मणून बुद्धानें भिक्षूंला अशा उमेदवारांना परस्पर संघांत घेण्याची परवानगी दिली. बुद्ध ह्मणाले:-
“भिक्षू हो, यापुढें भिन्न भिन्न राष्ट्रांत तुह्मींच प्रव्रज्या द्या व तुह्मीच उपसंपदा (संघांत घेण्याचा विधि) करा, पुढील नियमास अनुरून प्रवज्या आणि उपसंपदा करा. त्यानें (उमेदवारानें) मुंडन करावें व काषाय वस्त्रांनीं अंग आच्छादावें. नंतर मांडी न घालतां त्याला खालीं बसवावें, व हात जोडून १बुध्दं सरणं गच्छामि(मी बुद्धास शरण जातों) धम्मं सरणं गच्छामि(धर्माला शऱण जातों), संघं सरणं गच्छामि(संघाला शरण जातों) असें त्रिवार ह्मणायास लावावें. याप्रमाणें प्रव्रज्या आणि उपसंपदा करण्यास मी तुह्मांस परवानगी देतों.”
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- बुद्धाला गुरू-संघाचा संस्थापक- या नात्यानें शरण जातात. तो देवाचा अवतार या नात्यानें नव्हे.)

चातुर्मास संपल्यावर भगवान् बुद्ध वाराणसीहून धर्मोपदेश करीत गयेला आले. तेथें उरूवेल काश्यप नांवाचा जटाधारी ब्राह्मण राहत असे. त्याचे पांचशें जटिल शिष्य होते. सर्व मगध देशांतील लोक त्याला फार मानीत असत. त्यानें व त्याच्या शिष्यांनी बुद्धाचें अलौकिक तेज व विलक्षण धैर्य़ पाहून आणि अनुपम धर्मोपदेश ऐकून आपल्या जटा कापून त्या व अग्रिहोत्राचीं उपकरणें पाण्यांत टाकून दिलीं, व ते बुद्धाचे शिष्य झाले. उरूवेल काश्यपाचा नदीकाश्यप या नांवाचा भाऊ जवळच नदीकांठी आपल्या तीनशें शिष्यांसह राहत असे. त्यानें अग्रिहोत्राचीं उपकरणें आणि जटा नदींत वहात चाललेल्या पाहिल्या. आपल्या वडील भावास कांहीतरी उपसर्ग झाला असला पाहिजे असें त्यास वाटलें, व तो त्याच्या राहण्याच्या ठिकाणीं आला. तेथें भावाला बुद्धाचा शिष्य झालेला पाहून तोहि आपल्या शिष्यांसह बुद्धाचा शिष्य झाला. उरूवेल काश्यपाचा गया काश्यप नांवाचा तिसरा भाऊहि त्याच प्रदेशांत राहत होता. तोहि आपल्या दोनशें जटाधारी शिष्यांसहवर्तमान बुद्धाचा शिष्य झाला.
ह्या सर्व पूर्वीं जटिल असलेल्या भिक्षूसंघासह भगवान् बुद्ध राजगृह नगरास गेले. तेथें त्या वेळीं बिंबिसार राजा राज्य करीत होता. तो बुद्धाच्या आगमनाचें वर्तमान ऐकून मोठ्या समुदायासह बुद्ध राहत होते तेथें गेले. त्या वेळीं लोकांना बुद्ध कश्यपाचा गुरू किंवा काश्यप बुद्धाचा गुरू अशी शंका उत्पन्न झाली. काश्यप जेव्हां बुद्धाच्या पायां पडला तेव्हां लोकांची ही शंका दूर झाली. बिंबिसार राजानें वेळुवन नांवाचें उत्तम उद्यान बुद्धप्रमुख भिक्षूसंघास राहण्यासाठीं दान दिलें.
ह्या उद्यानांत भिक्षूसंघासह बुद्ध भगवान् राहत होते. त्या वेळीं राजगृहाजवळ संजय नांवाचा प्रसिद्ध परिव्राजक राहत होता. सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे दोघे ब्राह्मण संजयाच्या शिष्यांत प्रमुख होते. त्या दोघांनीं ज्याला प्रथम शांतिपद सांपडेल त्यानें तें इतरास सांगावें असा बेत केला होता. एके दिवसीं अस्सजि राजगृहांत भिक्षेसाठीं फिरत असतां सारिपुत्तानें त्याला पहिलें. अस्सजीची आनंदी आणि वैराग्ययुक्त मुद्रा पाहून सारीपुत्ताच्या मनांत त्याजविषयीं अत्यंत आदरभाव उत्पन्न झाला. तो अस्सजीच्या मागोमाग राजगृहांतून बाहेर पडला, व वाटेंत त्यानें अस्सजीस गांठलें. अस्सजीला कुशल प्रश्नादि करून झाल्यावर सारिपूत्त ह्मणाला:-“आयुष्मन, तुझी मुखचर्या प्रफुल्लित दिसत आहे. तुझा गुरू कोण? कोणत्या धर्मास अनुसरून तूं वागतोस?”