Get it on Google Play
Download on the App Store

धर्म 3

आरति विरति पापा मज्जपाना च संयमो।
अप्पमोदा च धम्मेसु एतं मंगलमुत्तमं।।७।।


पाप कर्मांला कंटाळून त्याजपासून दूर राहणें, मद्यपानाविषयीं मनाचा संयम करणें व कुशल (पुण्य) कर्मांत दक्ष असणें,हीं उत्तम मंगलें होत.

गारवो च निवातो च संतुट्ठि च कतञ्ञुता।
कालेन धम्मस्सवणं एतं मंगलमुत्तमं।।८।।


सत्पुरूषांचे गौरव करणें, नम्रभावानें वागणें, संतुष्ट असणें, कृतज्ञ असणें आणि वेळोवेळीं धर्मोपदेश ऐकणें, हीं उत्तम मंगलें होत.

खंति च सोवचस्सता समणानं च दस्सनं।
कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलमु्त्तमं।।९।।


क्षांति (सहन करणें), गोड बोलणें, श्रमणांची भेट घेणें आणि धर्मिकविषयावर वारंवार संभाषण करणें, हीं उत्तम मंगलें होत.

तपो च ब्रह्मचरियं च अरियसच्चन दस्सनं।
निब्बाणसच्छिकिरिया च एतं मंगलमुत्तमं।।१०।।


तपश्चर्या, ब्रह्मचर्य, चार आर्यसत्यें जाणणें व निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणें, हीं उत्तम मंगलें होत.

फुट्ठस्स लोकधम्मेहि चित्तं यस्स न कंपति।
असोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं ।।११।।


(लाभ आणि हानि, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुति, सुख आणि दु:ख ह्या आठ) लोक स्वभावांशीं संबंध झाला असतां ज्याचें चित्त न कांपतां शोकरहित, निर्मळ व सुखरूप राहतें त्याचें तें कृत्य उत्तम मंगल होय.

एतादिसानि कत्वान सब्बत्थ अपराजिता।
सब्बत्थ सोत्थिं गच्छन्ति तं तेसं मंगलमुत्तमं।।१२।।


वर सांगितलेल्या मंगलाचें आचरण करून कोठेंहि पराभव न पावतां जे खस्ति सुख मिळवितात, त्यांचें तें कृत्य उत्तम मंगल जाणावें.

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी
Chapters
बुद्ध व बुद्धधर्म 1 बुद्ध व बुद्धधर्म 2 बुद्ध 1 बुद्ध 2 बुद्ध 3 बुद्ध 4 बुद्ध 5 बुद्ध 6 बुद्ध 7 बुद्ध 8 बुद्ध 9 बुद्ध 10 बुद्ध 11 बुद्ध 12 बुद्ध 13 धर्म 1 धर्म 2 धर्म 3 धर्म 4 धर्म 5 धर्म 6 धर्म 7 धर्म 8 धर्म 9 धर्म 10 धर्म 11 धर्म 12 धर्म 13 धर्म 14 धर्म 15 धर्म 16 संघ भाग १ला 1 संघ भाग १ला 2 संघ भाग १ला 3 संघ भाग १ला 4 संघ भाग १ला 5 संघ भाग १ला 6 संघ भाग १ला 7 संघ भाग १ला 8 संघ भाग १ला 9 संघ भाग १ला 10 संघ भाग १ला 11 संघ भाग १ला 12 संघ भाग १ला 13 संघ भाग २ रा 1 संघ भाग २ रा 2 संघ भाग २ रा 3 संघ भाग २ रा 4 संघ भाग २ रा 5 संघ भाग २ रा 6 परिशिष्ट १ 1 परिशिष्ट १ 2 परिशिष्ट १ 3 परिशिष्ट १ 4 परिशिष्ट २ 1 परिशिष्ट २ 2 परिशिष्ट ३ 1 परिशिष्ट ३ 2 परिशिष्ट ३ 3 परिशिष्ट ४ 1 परिशिष्ट ४ 2