Android app on Google Play

 

संघ भाग १ला 12

 

शुभा भिक्षुणी एके दिवशीं जीवक वैद्याच्या आम्रवनास एकटीच जात होती. वाटेंत तिला एका लबाड मनुष्यानें गांठलें. तिच्या सुंदर रूपाकडे पाहून तो भुलून गेला, आणि आपली दुष्ट वासना तृप्त करण्यासाठीं तिचें मन तो वळवूं लागला. तिनें त्याला अनेक प्रकारें उपदेश केला; परंतु त्या कामांध माणसावर त्याचा कांहींएक परिणाम झाला नाहीं. शेवटीं तो बलात्कार करण्यास सुद्धां तयार आहे असें जेव्हां शुभेला दिसून आलें; तेव्हां ती त्याला ह्मणाली ‘अरे तूं मला कां अडवीत आहेस?’ तो पुन: तिच्या नेत्रादि सुंदर अवयवांचे वर्णन करूं लागला, आणि ह्मणाला:- “हे सुंदरि, हें तुझें सुंदर नेत्रयुग्म पाहून मी कामविकारानें पीडित झालों आहें. सुंदरी तु्झ्यावांचून प्रियतर असें मला ह्या जगामध्यें कांहीं नाहीं.”

शुभा ह्मणाली:- “एवढेंच ना? ह्या माझ्या डोळ्यांचीच तुला गरज. कांहीं हरकत नाहीं. घे हा डोळा.” असें ह्मणून बोटानें डोळा उपटून तो तिनें त्याच्या हातावर ठेवला. हें तिचें साहसी कृत्य पाहून तो मनुष्य घाबरून गेला, आणि त्यानें तिला साष्टांग प्रणिपात करून तिची क्षमा मागितली. भिक्षुणींवर अशा प्रकारचे प्रसंग येऊं नयेत एवढ्याचसाठीं त्यांनीं एकाकी राहूं नये, असा बुद्धांनीं नियम केला असला पाहिजे.

भुक्षुसंघांत जसे सारिपुत्त, कात्यायनादिक थोर तत्वज्ञानी आणि धर्मोपदेशक होऊन गेले, तशाच भिक्षुणीसंघांत क्षेमा, उत्पलवर्णादिक भिक्षुणी होऊन गेल्या. कित्येक प्रसंगीं मोठमोठ्या विद्वान् पुरूषांसहि त्यांनीं आपल्या अधिकारयुक्त वाणीनें उपदेश करून सन्मार्गाकडे वळविल्याच्या गोष्टी त्रिपिटकांत आढळतात. त्यांतील एक गमतीची गोष्ट कांही पालीगाथांसह येथें सांगून आजचा हा लांबलेला विषय आटोपतों.

पुण्णिका नांवाची भिक्षुणी पाहटेस उठून विहारांतील भिक्षुणींच्या उपयोगासाठीं पाणी आणण्यास नदीवर गेली होती. तेथें एका ब्राह्मण प्रात:स्नान करित होता. त्याला पाहून ती ह्मणाली:-

उदहारी अहं सीते सदा उदकमोतरिं।
अय्यानं दण्डभयं भीता वाचादोसभयट्ठिता।।
कस्स ब्राह्मण त्वं भीतो सदा उदकमोतरि।
वेधमानेही गत्तेहि सीतं वेधयसे भुसं।।

ह्या थंडीमध्यें भिक्षुणीसंघाच्या भयानें (मला दोष देतील ह्या भयानें) पाणी नेण्यासाठीं मी ह्या पाण्यांत उतरतें. परंतु हे ब्राह्मणा, ह्या तुझ्या थंडीनें आंखडून गेलेल्या गात्रांनी तूं ह्या पाण्यांत उतरतोस, तें कोणाच्या भयानें? थंडीनें तूं आंखडलेला दिसतो।

ब्राह्मण ह्मणाला:-

जानन्तीव तुवं भोति पुण्णिके परिपुच्छसि।
करोन्तं कुसलं कम्मं रूधन्तं कम्मं पापकं ।।
योच वुंड्ढो दहरो वा पापं कम्मं पकुब्बति।
दकाभिसेचना सोपि पापकम्मा पसुच्चति।।

मी पुण्यकर्म करीत आहें, आणि पापकर्माचा निरोध करतों आहें, हें जाणत असतां, भवति पुण्णिके, तूं हा प्रश्न कसा विचारतेस? जो कोणी ह्मातारा किंवा तरूण पाप करितो, तो प्रात:स्नानानें त्या पापापासून मुक्त होतो.( हे तुला ठाऊक नाही काय ?)
 

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी
Chapters
बुद्ध व बुद्धधर्म 1
बुद्ध व बुद्धधर्म 2
बुद्ध 1
बुद्ध 2
बुद्ध 3
बुद्ध 4
बुद्ध 5
बुद्ध 6
बुद्ध 7
बुद्ध 8
बुद्ध 9
बुद्ध 10
बुद्ध 11
बुद्ध 12
बुद्ध 13
धर्म 1
धर्म 2
धर्म 3
धर्म 4
धर्म 5
धर्म 6
धर्म 7
धर्म 8
धर्म 9
धर्म 10
धर्म 11
धर्म 12
धर्म 13
धर्म 14
धर्म 15
धर्म 16
संघ भाग १ला 1
संघ भाग १ला 2
संघ भाग १ला 3
संघ भाग १ला 4
संघ भाग १ला 5
संघ भाग १ला 6
संघ भाग १ला 7
संघ भाग १ला 8
संघ भाग १ला 9
संघ भाग १ला 10
संघ भाग १ला 11
संघ भाग १ला 12
संघ भाग १ला 13
संघ भाग २ रा 1
संघ भाग २ रा 2
संघ भाग २ रा 3
संघ भाग २ रा 4
संघ भाग २ रा 5
संघ भाग २ रा 6
परिशिष्ट १ 1
परिशिष्ट १ 2
परिशिष्ट १ 3
परिशिष्ट १ 4
परिशिष्ट २ 1
परिशिष्ट २ 2
परिशिष्ट ३ 1
परिशिष्ट ३ 2
परिशिष्ट ३ 3
परिशिष्ट ४ 1
परिशिष्ट ४ 2