Get it on Google Play
Download on the App Store

गर्भपात

गर्भपात किंवा 'अर्धेकच्चे पडणे' हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकतो. गर्भधारणा होऊन सात महिने (28आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला गर्भपात म्हणतात. असा गर्भ बाहेर पडताना जिवंत असला तरी काही केल्या जगत नाही. (सात महिने पूर्ण असतील तर मात्र खास उपायांनी मूल जगवता येते.म्हणून सात महिन्यांनंतर गर्भ पडला तर अपु-या दिवसांचे बाळंतपण म्हणतात; गर्भपात म्हणत नाहीत.) गर्भपात हा वैद्यकीय शास्त्रानुसार बाळंतपणापेक्षा जास्त जोखमीचा असतो.

गर्भ वारंवार पडत असेल (म्हणजे तीन अथवा अधिक वेळा) तर लिंगसांसर्गिक आजार किंवा गर्भाशयाचे तोंड सैल असणे ही कारणे असू शकतात.