प्रसवोत्तर काळ: निदान
बाळाच्या जन्मानंतरचे पहिले २४ तास (सुरुवातीचे प्युर्पेरिअम) स्थिती खूपच नाजुक असते. हीच वेळ असते जेव्हा आपले गर्भाशय व्यवस्थित आखडले जाते, जेणेकरुन नाळ जोडलेल्या ठिकाणातून होणारा रक्तस्त्राव थांबेल. याचवेळी स्तनपानास आणि आई व बाळामध्ये नाते जुळण्यास सुरुवात होते. कधीकधी ह्यावेळी प्रसूतीमुळे जिवाला धोकादायक अशा गुंतागुंती निर्माण होतात. ह्यामध्ये प्रसूतीनंतरचा अधिक रक्तस्त्राव, रक्तप्रवाह कोसळणे, ह्रदयाघात, इत्यादी मोडतात. हे फार सर्वसाधारण नाहीत, पण सामान्य योनीमार्गाद्वारा झालेल्या प्रसूतीमध्येसुद्धा मृत्यूचा धोका असतो. सुमारे १०००० स्त्रियांमध्ये १. हा धोका अशा स्त्रियांमध्ये जास्त असतो ज्या पूर्वीपासून शारीरिकदृष्ट्या दुर्बळ असतात, जसे, रक्तक्षय, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग. हा धोका सिझेरियन प्रसूतीमध्येसुद्धा जास्त असतो. म्हणूनच अशा स्त्रियांना प्रसूतीनंतर किमान २४ तास दवाखान्यात राहण्याचा सल्ला दिला जातो.