गर्भधारणेचे वय निश्चितता
स्त्रीच्या वाढत्या वयाबरोबर तिची प्रजननक्षमता कमी होत जाते. साधारण ३५वर्षांनंतर तिच्या प्रजनन क्षमतेत दखलपात्र कमतरता देते. त्यामुळे वंधत्वाच्या त्रासाला आणि उपचाराला सामोरे जाऊ लागू शकते. पस्तिशीनंतरच्या गरोदरपणामध्ये आईला उच्चरक्तदाब, किडनी विकार किंवा हिपॅटायटिस यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे पहिले गरोदरपण साधारणत: तिशीच्या आतच प्लॅन करावं. पस्तिशीनंतरच्या बाळंतपणात सिझेरियन शस्त्रक्रियेचं प्रमाण फारच वाढतं. पस्तिशीनंतरच्या गरोदरपणामध्ये डाऊन सिण्ड्रोम यासारख्या गर्भाच्या आजारांमुळे पंगू मूल होण्याची शक्यता वाढते.
गरोदरपणाप्रमाणेच बाळंतपणाविषयीही अनेक गैरसमज आहेत. यशस्वी बाळंतपण याचा अर्थ टाक्याशिवाय, ऑपरेशनशिवाय ( बाळंतपणा नंतर बाळाच्या तब्येतीकडे लक्ष देताना स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड होऊ न देण्यासाठी काळजी घ्यावी. ) बाळंतपण असं समीकरण मांडलेलं दिसतं, ते मुळात चुकीचे आहे. ज्या बाळंतपणाच्या शेवटी मूल आणि आई सुखरुप असतात, ते बाळंतपण यशस्वी, नॉर्मल अशी व्याख्या आहे. मात्र ते टाक्याचं किंवा शस्त्रक्रियेचं असलं तरीसुद्धा ! कारण टाके घालणं किंवा शस्त्रक्रिया ( फॉर्सेप्स किंवा सिझेरियन ) ही मुलाला किंवा आईला धोक्यातून वाचविण्याकरिताच करतात. हा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घ्यायला हवा. पूर्वी १८-१२ मुलं होत असत- काही मुले बाळंतपणात गेली तरी वावगं मानत नसत. परंतु आज प्रत्येक मुल हा एक नवीन जीव आहे आणि त्याला वाचविणं आणि सुरक्षितपणे या जगात आणणं यासाठी काहीही करावं लागलं तरी ते रास्तच आहे हा दृष्टीकोन ठेवायला हवा.
खालून होणाऱ्या बाळंतपणांतसुद्धा टाके घालावे लागल्यास त्यामुळे पुढे उद्भवणारा योनिभागाचा ढिलेपणा (Protapse) टाळता येतो. योग्य वेळी टाके न घातल्यास उतारवयात ‘मायअंअग’ बाहेर पडून मोठी शस्त्रक्रिया करून घेण्याची वेळ येते. याचा अर्थ प्रत्येक बाळंतपणात टाके घालावेच लागतात असा नव्हे. पण टाके घालावे लागले, विशेषतः पहिल्या बाळंतपणात, तर त्यात वावगं काहीच नाही हे समजूत घ्यायला हवं. त्याचप्रमाणं बाळंतपणानंतर प्रकृती पूर्ववत व्हावी म्हणून परंपरेनं ज्या काही गोष्टी इष्ट मानल्या आहेत. त्यातलासुद्धा अंधश्रद्धेचा भाग सोडून, उपयुक्त व व्यवहार्य तेवढा भाग स्वीकारायला हवा. उदाहरणार्थ पोट बांधणं किंवा शेक शेगडी घेणं घेणं. गरोदरपणात पोटाचे स्नायू ताणले गेल्यामुळं बाळंतपणानंतर लगेच पोट थोडं शिथील वाटतं पण पोट बांधून ठेवल्यानं ते ‘सुटायचं’ टाळता येतं हा गैरसमज आहे. बाळंतपणानंतर शक्य तेवढ्या लवकर ( सिझेरियन झाले असल्यास टाके भरून आल्यावर ) पोटाचे व्यायाम सुरू करावे. सुरुवातीला झोपूनच किंवा बसून ( व नंतर उभं राहून ) श्वास पूर्ण बाहेर सोडून पोट आत ( खपाटीला ) ओढून घ्यावे. जेवढा वेळ धरता येईल तेवढा वेळ, घट्ट धरावे व मग पूर्ण सैल सोडावे याप्रमाणे सकाळी, दुपारी संध्याकाळी व रात्री १०-१० वेळा केल्याने पोटाचे स्नायू घट्ट होतात.
पुढे हळूहळू शाळेतील P.T. चे व्यायाम किंवा योगासनापैकी काही आसने (शलभारून, सर्वांगासन, हलासन, भुजंगासन वगैरे) करावीत.
ज्यांना काही कारणास्तव जास्त दिवस किंवा काही आठवडे अंथरुणातच पडून रहावं लागतं, (रक्तस्त्राव होऊन किंवा ताप येऊन अशक्तपणा आला असल्यास) त्यांना व्यायाम करणे अशक्य असल्याने अशा बाळंतपणासाठी सबंध अंगाला मॉलिश करून घेतले तर व्यायामाइतका हलकेपणा शरीराला वाटेल.