गर्भ आणि गर्भाचा विकास
पुरुषाकडून आणि स्त्रीकडून प्रत्येकी एक सूक्ष्म बीज (पेशी) एकत्र येऊन गर्भधारणा होते. पुरुषाकडून येणा-या पेशीला शुक्रबीज म्हणतात आणि स्त्रीकडून येणा-या पेशीला स्त्रीबीज. स्त्री-पुरुषसंबंधाच्या वेळेस इतर परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा या दोन पेशी एकत्र येऊन गर्भधारणा होते. ही प्रक्रिया स्त्रीच्या शरीरामध्ये २४ ते ३६ तास सुरु असते कधी कधी या प्रक्रियेला आठवडा देखील लागू शकतो.
गर्भधारणेच्या पहिल्या १० आठवड्यांमध्ये बाळाच्या पेशींचा वस्तुमान विकास होतो. या प्रक्रियेत पेशींमध्ये विविध प्रकारांमध्ये भाग पडू लागतात. अवयव, शरीर आणि गुंतागुंतीच्या प्रणालींच्या प्रक्रिया प्राथमिक स्तरावर पूर्ण होतात. शेवटच्या टप्प्यात भ्रुणाचे डोळे, तोंड हाताची आणि पायाची बोटं, कान असे अवयव दिसू लागतात. हा गर्भ नाळेद्वारे आईबरोबर जोडला जातो. त्यातून त्याला पोषण ग्रहण करता येते, नाळेमुळे गर्भ आणि गर्भवती एकमेकांशी जोडलेले असतात.
पहिले १० आठवडे संपल्यानंतर गर्भ हा खऱ्या अर्थाने गर्भ म्हणून ओळखला जातो. सुरुवातीच्या टप्प्यापेक्षा या टप्प्यात गर्भपाताचा धोका कमी असतो. या वेळी गर्भाची लांबी जवळपास ३० मी.मी. (१.२) इंच इतकी असते. गर्भाद्वारे यावेळी काही अनैच्छिक हालचाली होऊ शकतात. या टप्प्यामध्ये त्याची शरीर प्रणाली आणि संरचनेचा विकास होतो. तिसऱ्या महिन्यात त्याचे लैंगिक अवयव दिसू लागते. बहुतांश गर्भावस्थेच्या शेवटच्या आठवड्यात शारीरिक वाढ दिसून येते.
नंतर त्यापासून सतत विभाजनाने अनेक पेशींची निर्मिती होते. हळूहळू पेशींची संख्या वाढेल तशी त्यांची तीन पदरांमध्ये रचना होते. त्या प्रत्येक पदराची वेगळी वाढ होऊन निरनिराळे अवयव व संस्था तयार होतात. या सर्व घटनाक्रमाला साधारणपणे २८० दिवस लागतात.