व्यवस्थापन
पूर्व-मातृत्व संगोपन उपस्थित
स्त्रीची मांडणी पुरुषापेक्षा वेगळी असल्याने तीला विशिष्ट प्रकारच्या काळजीची गरज असते. स्त्रीच्या रज:प्रवर्तनापासून ते रजोनिवृत्तिपर्यंत होणार्या विविध प्रकारच्या वात-व्याधींची चिकित्सा येथे केली जाते. या रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्गाला स्त्री आरोग्याचे ज्ञान दिले जाते. येथील स्त्री रोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग 'स्त्री रोग व प्रसूती तज्ञ' या विभागासाठी सतत कार्यरत असतात.
पोषण
गरोदरपणात बाळाची संपूर्ण वाढ ही आईच्या आरोग्यावर अवलंबून असते. त्यामुळे गरोदरपणात आई पूर्णपणे निरोगी असणं जरुरीचंं आहे. गरोदरपणापूवीर्पासूनच आहारात योग्य पोषणमूल्यं असावीत प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, काबोर्हायड्रेट्स जीवनसत्त्वं तसंच झिंक मॅग्नेशियम यासारखी सूक्ष्म पोषणदव्यं याचं योग्य प्रमाण असलेला आहार असावा. आईचं पोषण जर योग्य असेल तर बाळाची मानसिक तसंच शारीरिक वाढ उत्तम प्रकारे होते. योग्य आहारामुळे गरोदरपणातील डायबिटिस तसंच उच्चरक्तदाब यासारख्या आजारांपासूनही संरक्षण मिळू शकतं. गरोदरपणाच्या आधीपासूनच जर आईचं पोषण योग्य असेल तर तो दुग्दशर्करा योग्य ठरतो. गरोदरपणाच्या सुरुवातीला जर पोषणदव्यांच्या योग्य साठा आईच्या शरीरात असेल तर गरोदरपणात आईच्या शरीरावर कमी ताण पडतो.
मॅग्नेशियम आणि झिंक हे हॉमोर्नच्या योग्य चयापचयासाठी जरुरी असते. फॉलिक अॅसिड बाळाच्या चेतासंस्थेच्या वाढीसाठी अत्यंत जरुरीचे असते. गर्भाच्या चेतासंस्थेची मुख्य वाढ पहिल्या तीन महिन्यात होते. दिवस राहिल्यापासून पहिल्या २८ दिवसांमध्ये फॉलिक अॅसिडचा गर्भाच्या चेतासंस्थेवर सर्वात जास्त परिणाम होतो. एवढ्या लवकर त्या स्त्रीला आपल्या गरोदपणबद्दल जाणीवही झालेली नसते. म्हणूनच फॉलिक अॅसिड हे प्रेग्नन्सी प्लॅन करण्याअगोदरच सुरू केले तर त्याचा जास्त फायदा होतो. फॉलिक अॅसिडमुळे गर्भाचा हा आजार टाळता येतो. लोहाची गरज गरोदरपणात वाढलेली असते. यासाठी मांसाहाराचा समावेश असावा. आईला आहारात कॅल्शियमची कमतरता पडली तर गर्भ आपला कॅल्शियमची गरज आईच्या शरीरातून भागवू लागतो. यामुळे पुढे आईच्या हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडं ठिसूळ होऊ शकतात. यामुळे गरदोरपणाच्या आधीपासून कॅल्शियमची ही वाढीव गरज दूध तसंच दुग्धजन्य पदार्थांपासून भागवली पाहिजे. दिवसातील कमीतकमी दहा मिनिटं सूर्यप्रकाशात गेल्यास 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता भरून येते.
हिपॅटायटिस बी, रुबेला किंवा कांजिण्या यासारखे आजार गरोदरपणात आईला तसंच बाळाला घातक ठरू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करणं जरुरीचं ठरतं. हे लसीकरण गरोदरपणाच्या कमीतकमी तीन महिने आधी करावं. पती किंवा पत्नी यांना किंवा जवळच्या नातेवाईकांना कोणताही आनुवंशिक आजार असेल तर ते गरोदरपणाच्या अगोदरच डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्यायला हवा. थॅलेसेमिया मायनरसारखा आजार असलेल्या स्त्री किंवा पुरुषाने तोच आजार असलेल्या दुसऱ्या व्यक्तीशी विवाह करू नये. तसं केल्यास गरोदर राहिल्याबरोबर स्त्रीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरोदर राहण्यापूवीर् स्त्रीला दमा, उच्चरक्तदाब, डायबिटिस किंवा हृदयविकार यासारख्या कोणत्याही विकारांवर औषधे सुरू असतील तर ती डॉक्टरांना दाखवावीत. यापैकी एखादे औषध गर्भाला घातक ठरू शकेत. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांसाठी ही औषधे बदलावी लागू शकतात. दातांचे उपचार शक्यतो गरोदरपणापूवीर्च करून घ्यावेत.जर स्त्री गरोदरपण लांबवण्यासाठी कुठलेही इंजेक्शन किंवा गोळ्या घेत असेल तर ते साधारण दोन महिने अगोदर थांबवावे. गरोदरपणा अगोदर तांबी काढून टाकावी. आणि जर का तांबी गर्भाशयात असतानाच स्त्री गरोदर राहिली तर गरोदरपणाच्या १२ ते १४ आठवड्याच्या आतच ती डॉक्टरांकडून काढून घ्यावी. त्यानंतर ती काढणं फार कठीण होते. आणि १२ ते १४ आठवड्यानंतर ती काढण्याचा प्रयत्न करू नये. वाढत्या गर्भावर ती कोणताही वाईट परिणाम करत नाही. आणि बाळंतपणानंतर ती काढून टाकता येते. स्त्रीला जर मद्य किंवा सिगारेटचे, तंबाखू व्यसन असेल तर तिने ते पूर्ण थांबवयास हवे. कारण या व्यंग असलेले बाळ जन्म घेऊ शकते. तसंच या व्यसनांमुळे गरोदरपणात आईच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
वजन वाढणे
एखाद्या गर्भवती महिलेचं वजन प्रत्येक भेटीच्या वेळेस तपासून पाहावे. सामान्यतः गर्भधारणेदरम्यान त्या महिलेचं वजन 9-11 किलोंनी वाढतं. पहिल्या तिमाहीनंतर, प्रत्येक गर्भवती महिलेचं दर महिन्याला 2 किलो किंवा दर आठवड्याला अर्धा किलो वजन वाढतं. तिचा आहार जर योग्य नसेल, आवश्यक कॅलरीजपेक्षा कमी असेल, तर त्या महिलेचं वजन गर्भधारणेदरम्यान केवळ 5-6 किलोंनीच वाढेल.
त्या महिलेचं वजन दर महिन्याला 2 किलोपेक्षा कमी वाढलं असेल तर तिला पुरेसा आहार मिळत नाही अशी शंका घेता येईल. तिला पूरक आहारावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कमी प्रमाणात वजन वाढण्याचा हा संकेत असतो की गर्भाशयातील वाढ मंदावली आहे आणि त्याचा परिणाम बाळाच्या जन्मावेळी त्याचं वजन कमी राहण्यात होतो. अधिक वजन वाढण्यानं (एका महिन्यात 3 किलोपेक्षा जास्त) अशी शंका घेता येईल की प्रि-एक्लॅम्पसिया / जुळे असण्याची शक्यता आहे. तिला वैद्यकीय अधिका-यांकडे पाठवण्यात यावे.
गर्भाशयात मुल वाढते तेव्हा स्त्रीचे वजनसुद्धा वाढत असते. यामुळे बाळाचे वाढ नीट होते आहे किंवा नाही हे लगेच समजते. नऊ महिन्यांपर्यंत आईचे वजन ११ ते १३ किलोनी वाढले पाहिजे. बऱ्याचदा गरोदर बाईचे वजन ४ - ५ किलोनीच वाढते अशावेळी बाळसुद्धा कमी वजनाचेच जन्मते. कमी वजनाची मुलेसारखी आजारी पडतात व ती दगावण्याची शक्यता असते.
पोटात बाळ वाढत असताना त्याला पोषणाची गरज असते. म्हणूनच गरोदर बाईने नेहमीपेक्षा जास्त जेवले पाहिजे. एका वेळेस जेवण जात नसेल तर थोड थोड दिवसातून ३ ते ४ वेळा खायला पाहिजे. गरोदर पणात कमी जेवावे, जास्त जेवल्यास बाळंतपण जड जाते, ही समजूत चुकीचे आहे. खर तर पुरेसे जेवल्याने बाळाची वाढ चांगली होते. तसेच संपूर्ण पोषकयुक्त आहार घेतला पाहिजे.
स्त्री जर लठ्ठ असेल तर गरोदरपणात तिला उच्चरक्तदाब, किडनीचा विकार तसंच रक्ताच्या गुठळ्या होण्याचा विकार उद्भवू शकतो. तसंच लठ्ठपणामुळे प्रसूतीसंबंधी अडचणी उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे सिझेरियन प्रसुतींची शक्यता वाढते. तसंच सिझेनियन करताना द्यावी लागणारी भूल देणं कठीण ठरू शकते. आईच्या लठ्ठपणामुळे मोठ्या आकाराचे आणि जास्त वजनाचे मूल होऊन प्रसूती कठीण होऊ शकते.
हे सर्व गरोदरपणाअगोदर वजन प्रमाणात आणल्यास टाळू शकतात. अतिस्थौल्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रियेनंतरची जखम भरण्यास वेळ लागू शकतो. बाळंतपणानंतर होणाऱ्या जंतुसंसर्गाचे प्रमाण स्थूल स्त्रियांमध्ये जास्त असते.