Get it on Google Play
Download on the App Store

व्यायाम

गर्भवती महिलांमध्ये अनेक बदल होत असतात. हे बदल शारीरिक व मानसिक असू शकतात. या लेखात शारीरिक बदल व त्यावरील उपाय याविषयी चर्चा केली आहे.

शारीरिक बदल हे संप्रेरकांमधील बदलांमुळे (हार्मोनल चेंजेस) होतात. या बदलांमुळे वजन वाढते, स्नायू- सांध्यांत बदल होतात, सांधे ढिले पडतात, त्यांची लवचिकता वाढते. याव्यतिरिक्त आणखी शारीरिक बदल म्हणजे- कंबर दुखू लागते, हाता-पायांवर सूज येते, थकवा जाणवतो, धाप लागते. कंबरदुखी ही तर अगदी नेहमीची तक्रार आहे. 50 ते 70 टक्के गर्भवतींना हा त्रास जाणवतो. 30 टक्के महिलांना पायात गोळे येण्याचा त्रास होतो; तर 20 टक्के महिलांना कार्पेट टनेल सिंड्रोमसारखे (Carpet tunnel syndrome) त्रास होतात.

या सर्व त्रासांवर उपाय म्हणजे नियमित व्यायाम करणे. पण गर्भारपणातील व्यायाम ही एक काळजीची गोष्ट असते. त्यामुळे व्यायाम करताना अत्यंत खबरदारी घ्यावी लागते.