Get it on Google Play
Download on the App Store

गर्भवती स्त्रीमध्ये होत असलेले बदल

पहिल्या तीन महिन्यामध्ये मातेच्या शरीरात गर्भधारण करण्याच्या दृष्टीने बदल होतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे मळमळ, उलट्या आणि मूड बदल. स्तनांचा आकार बदलणे, स्तनांचा कडकपणा बदलून ते मऊ होणे , थकवा, काहीं पदार्थ खाण्याची इच्छा होणे. गर्भधारणेनंतर पहिल्या काहीं आठवड्यात स्तनाग्रांच्या भोवतालची जागा काळवंडते. दुसऱ्या तिमाहीमध्ये मातेमध्ये उत्साह वाढतो. गर्भाचा आकार वीसपटीनी मोठा होतो. 19-20 व्या आठवड्यात मातेस गर्भाची हालचाल जाणवते. या काळात मातानी सैल कपडे वापरावेत. तिस-या तिमाहीमध्ये मातेचे पोट खाली उतरते.

बहुतांशी दर महिन्यामध्ये येणारी मासिक पाळी चुकल्यामुळे गर्भावस्था असल्याची शंका येते . वैद्यकीय अधिकारी अशा वेळी प्रत्यक्ष तपासणी किंवा मूत्रतपासणी करून गर्भावस्थेची खात्री करून घेतात. सध्या औषध विक्री केंद्रामध्ये गर्भावस्था असल्याची खात्री करून घेण्यासाठी तयार उपकरणे मिळतात. मानवामध्ये हा काळ साधारण ४० आठवड्यांचा असतो. (फलन ते बालकाचा जन्म) या काळाला गर्भारकाळ म्हणतात. गर्भारकाळाचे सामान्यतः तीन काळ मानले जातात.पूर्ण गर्भाची वाढ होण्यास सु. चाळीस आठवड्यांचा कालावधि आवश्यक आहे. हा चाळीस आठवड्यांचा काळ शेवटच्या मासिकपाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजण्यात येतो. कारण मासिक पाळी आली नाही म्हणजे त्या महिन्याच्या गर्भचक्रामधील बाराव्या ते चवदाव्या दिवशी अंडमोचन आणि निषेचन झालेले असते. सामान्यपणे गर्भावस्थेचे तीन तीन महिन्यांचे तीन टप्पे मानण्यात येतात.

पहिली तिमाही - पहिल्या बारा आठवड्यात भ्रूणावस्था आणि गर्भाची प्राथमिक वाढ होते.

दुसरी तिमाही - गर्भावस्थेचा 13-27 आठवड्यांचा काळ

तिसरी तिमाही - गर्भावस्थेचा 28 ते 40 आठवड्यांचा काळ