Get it on Google Play
Download on the App Store

औषधोपचार

र्भवतीने घेतलेली औषधे तिच्या पोटातील गर्भापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे नाळ (वार उर्फ प्लॅसेंटा). गर्भाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी गरजेचा असलेला प्राणवायू आणि इतर पोषकद्रव्ये ह्या नाळेमार्फतच गर्भापर्यंत पोहोचवली जातात. गर्भवतीने घेतलेल्या औषधांचे विविध परिणाम गर्भावर होऊ शकतात. उदाहरणार्थ –

  • गर्भावर थेट नुकसान, अनैसर्गिक वाढ इ. (ह्यांमुळे बाळात जन्मतःच दोष असू शकतात) किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.
  • नाळेच्या कामात बदल होणे किंवा अडथळा येणे. नाळेतील रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने आईकडून गर्भाला होणारा प्राणवायूचा आणि इतर पोषकद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. परिणामी बाळाचे वजन कमी असू शकते किंवा ते अविकसित असू शकते.
  • कधीकधी गर्भाशयांच्या स्नायूंचे जोरदार आकुंचन होऊन गर्भाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो व त्याचे अप्रत्यक्ष नुकसान होते. ह्याने क्वचित कळा वेळेआधीच सुरू होऊन अपुर्या दिवसांचे बाळ जन्माला येऊ शकते.

व्हिलीमधील गर्भाची रक्ताभिसरण यंत्रणा व इंटरव्हिलस जागेमधली आईची रक्ताभिसरण यंत्रणा ह्यांमध्ये फक्त एक अतिशय पातळ अर्धपटल (प्लॅसेंटल मेंब्रेन) असते. आईच्या रक्तात मिसळलेली औषधे हे अर्धपटल सहजपणे पार करून व्हिलीतील रक्तवाहिन्यांमध्ये येतात आणि नाळेमधून गर्भापर्यंत पोहोचतात.

एखाद्या औषधाचा गर्भावर होणारा परिणाम त्या औषधाची शक्ती व मात्रा (डोस) आणि गर्भाच्या विकासाच्या स्थितीवर अवलंबून असतो. गर्भधारनेच्या अगदी सुरुवातीला म्हणजे फलनानंतर २० दिवसांत घेतलेली काही औषधे गर्भ नष्टही करू शकतात अथवा त्यांचा गर्भावर काहीही परिणाम होत नाही! इतक्या लहान वयाचा गर्भदेखील ज्न्मजात व्यंगांना विरोध करू शकतो. परंतु फलनानंतरच्या तिसर्या आठवड्यापासून आठव्या आठवड्यापर्यंतचा गर्भ जन्मजात व्यांगांना बळी पडू शकतो. ह्या काळात गर्भापर्यंत पोहोचलेल्या औषधांमुळे एकतर गर्भावर काहीही परिणाम होत नाही किंवा चक्क गर्भपातच होऊ शकतो! किंवा अशा बाळास जन्मतः काही व्यंग असू शकते किंवा एखादे लपलेले व्यंग त्याच्या नंतरच्या आयुष्यात उघड होऊ शकते. गर्भाचे अवयव विकसित होऊ लागल्यानंतरच्या दिवसांत घेतलेल्या औषधांचा परिणाम जन्मजात व्यंगांमध्ये सहसा होत नाही परंतु सर्वसामान्य अवयव आणि उतींच्या वाढीवर तसेच कामावर होऊ शकतो.

अन्न आणि औषध प्रशासनातर्फे (फूड ऍँड ड्रग ऑथॉरिटी – FDA) औषधांचे वर्गीकरण, ती गर्भावस्थेत घेतली गेल्यास, गर्भास असलेल्या संभाव्य धोक्यानुसार केले जाते. काही औषधे अतिशय विषारी असतात व गर्भवतींनी ती कधीही घेऊ नयेत कारण त्यांमुळे जन्माला येणार्याष बाळामध्ये गंभीर व्यंगे उद्भवू शकतात – उदा. थॅलिडोमाइड (थॅलोमिड). बर्यााच दशकांपूर्वी गर्भवती हे औषध घेत असत परंतु ह्याचा दिसून आलेला दुष्परिणाम म्हणजे जन्माला येणार्याव मुलांचे हातपायांची वाढच झालेली नसायची. तसेच त्यांच्या आतड्यांमध्ये, हृदयात आणि रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर दोष असायचे. काही औषधांची प्राण्यांवर चाचणी केली असता त्यांच्या गर्भांमध्ये दोष आढळले परंतु मानवी गर्भांवर तेच दुष्परिणाम झालेले आढळले नाहीत – उदा. मेक्लिझिन (उर्फ ऍँटिव्हर्ट) हे औषध बरेचदा उलट्या, गाडी लागणे, मळमळणे ह्यांवर घेतले जाते.