दुसरी तिमाही
दुसरा काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले तीन महिने(१२ आठवडे) ते ६ महिने (२८ आठवडे) हा काळ मानला जातो. या काळात वजन वाढण्यास सुरुवात होते. गर्भधारणा असलेले १२ आठवड्याचे गर्भाशय ओटीच्यावर हाताने जाणवता येऊ शकते. बाळाची वाढ व हालचाल सुरु राहते. २० आठवडे पूर्ण होताना मातेस गर्भाची हालचाल जाणवू लागते. गर्भातील बाळाची इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया सुरु होते. गर्भ मुत्रविसर्जन करते की जे गर्भजलाचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. याकाळात जननेंद्रिय तयार होत की जे स्त्री-पुरुष भ्रूण ओळखले जाऊ शकते. गर्भावस्थेची दुसरी तिमाही 13 ते 27 आठवड्यांची असते. या कालावधिमध्ये गर्भाची प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आणि स्नायूंचे चलनवलन चालू होते. अपरा पूर्णपणे विकसित झालेली असते. गर्भाच्या मेंदूची वाढ हा या टप्प्यामधील महत्त्वाचा घटक आहे.
१४-१६ आठवडे पूर्ण होताना स्तनांमध्ये पिवळसर चिकट द्रव तयार होणे सुरु होते. गर्भाशयाला ब्रॅस्टन-हिक्स आकुंचन (Braxton Hicks contractions) सुरु होतात की जी गर्भारपणात गर्भाशयाच्या स्नायूंची हालचाल करून त्यात तान व्यवस्थित करण्याबरोबर गर्भाला उत्तेजित करत असतात. याद्वारे भ्रूणातील रक्तसंक्रमण व्यवस्थित केले जाते.