प्रसवोत्तर काळ
बाळाच्या जन्मानंतर आईच्या शरीरात, विशेषतः लैंगिक अवयवांमध्ये बदल घडतात. हे अवयव परत आपल्या गरोदरपणापूर्वीच्या स्थितीत येतात त्या काळाला वैद्यकीय भाषेत प्युर्पेरिअम असे म्हणतात. हा प्रसूतीनंतरचा काळ सहा आठवडयांपर्यंत (४२ दिवस) चालू राहतो. ह्या काळाच्या शेवटी तुम्हाला परत सामान्य स्थितीत आल्यासारखे वाटते. फक्त काही बदल जाणवू शकतात. जसे की थोडे वाढलेले वजन.