खरा तो प्रेमा ना धरि लोभ ...
राग पहाडी, ताल केरवा.
खरा तो प्रेमा ना धरि लोभ मनीं ॥ध्रु०॥
नभिं जनहितरत भास्कर तापत, विकसत पहा नलिनी ॥
ना धरि ॥ पीडित जन देखतां, स्वसुखा त्यागी दया ।
जनभयहरण हेंजि सुख, सदया देवराया ।
दर्शन गुणवंताचें नाचवी प्रेमलहरी गुणरस-
पान हेंचि सुख, प्रेम तया नांव जनीं ॥१॥