नमन नटवरा विस्मयकारा । आत...
राग हमीर, ताल त्रिवट.(नांदी)
नमन नटवरा विस्मयकारा । आत्मविरोधी कुतूहलधरा ॥ध्रु०॥
विवाह करुनी मदन जाळिला । मग मदनमित्र इंदु सेविला ॥
धनवैरागी द्यूत खेळला । गौरीचा तो अंकित झाला ।
परमेशाच्या ऐशा लीला । कविकृष्ण गात विस्मयकारा ॥१॥