Get it on Google Play
Download on the App Store

गोड निबंध - २ 25

स्पॅनिशांच्या आगमनानंतरचा इतिहास अत्यंत करुणास्पद आहे.  अंगावर शहारे येतात व रक्त गोठून जातें, असे अत्याचार रक्तपिपासु व द्रव्यलोभी स्पॅनिशांनी केले!  सर्वच युरोपियन वसाहतवाल्यांचा इतिहास रक्तानें लिहिलेला आहे.  परन्तु त्यांत स्पॅनिशांनी कळस केला.  मयांचे वैभव गेलें व ते गुलाम झाले.  स्पॅनिश लोकांनी येथें येऊन सर्वस्वाचा नाश केला! मयांची शहरें, घरेंदारें सर्व भस्मसात् केलें.  ते मय लोकांना व राजाला सांगत, ही खोली सोन्याचांदीने भरून द्या, ही दुसरी द्या, ही तिसरी द्या!  मयलोकांनी आपल्या अगणित द्रव्यानें खोल्या भरून दिल्या - मग स्पॅनिशांना आणखी हांव सुटून ते सर्वांना छळीत, भाजीत, मारीत !  मयांची सोन्याचांदीचीं भांडी स्पेनला गेलीं व ते अन्नाला मोताद होऊन रानावनांत हिंडूं लागले.  एके काळीं वैभवाचे शिखरावर असलेले हे सुसंस्कृत लोक आज जगांतील रानटी म्हणून समजले जात आहेत.  स्वतंत्र असलेले लोक पारतंत्र्यात लोळत आहेत!  सोन्याचांदीच्या ढिगावर बसणारे आज मातीच्या मडक्यांनाहि महाग झाले आहेत!  हा सगळा प्रभाव कशाचा? हा प्रभाव पांढ-या पायांचा.  जेथें जेथें हे पांढरे अवदसेचे पाय गेले तेथें तेथें एकच इतिहास आहे.  पाश्चात्य लोकांच्या संस्कृतीचा हा एकमेव विशेष आहे कीं आपल्यापेक्षां संस्कृतीनें उच्च असलेल्या लोकांचा नायनाट करून त्यांची संस्कृति लयास न्यावयाची व नंतर रानटी मानून त्यांची हेटाळणी करावयाची व आम्ही त्यांस सुधारणारे, संरक्षणारे म्हणून पुन्हां मोठेपणा घ्यावयाचा.  मयांचा इतिहास, अझरकेस् इंकाझ् यांचा इतिहास, इजिप्तचा इतिहास, हिंदुस्थानचा इतिहास, चीनचा इतिहास - सर्वत्र हेंच भीषण व रक्ताळ चित्र दिसतें.

मयांच्या संस्कृतीची अनेक अंगे होती.  शिल्पशास्त्र, ज्योतिष, गणित, नानाकला व खेळ - सर्व बाबतीत मय लोक तत्कालीन जगाच्या कितीतरी पुढें गेले होते.  आज अमेरिकेंतील लोक अत्युच्च इमारती बांधतात, परंतु मय लोक प्राचीन काळीं तीनचारशें फूट उंचीच्या इमारती किती तरी बांधीत.  इमारती बांधण्याचे कामीं मयलोकांचा हातखंडा असे.  भव्य व सुंदर इमारतींचे अवशेष आज मध्य अमेरिकेंत सांपडले आहेत.  आज सुमारें सतरा शतकें या भिंती वारा पाऊस खात पडल्या आहेत.  आज सीमेंट काँक्रीटचा शोध लागला व त्यामुळें इमारती बांधण्याच्या कलेंत मोठी क्रांति घडून आली असें सर्वसाधारण मानतात.  परंतु मय लोकांच्या या सर्व इमारती सीमेंट काँक्रीटच्या आहेत.  मयांना हा शोध पूर्वीच माहीत होता.  दगडावर खोदीव काम करण्यांतहि ते तरबेज होते.  मोठमोठया चुन्याविटांच्या, दगडांच्या भव्य व विशाल इमारती बांधून त्यांत आनंदमय जीवन नेणारे हे मय आज रानावनांत वणवण करीत आहेत.  मय लोक मोठमोठे राजवाडें, देवळें वगैरे बांधून आपल्या शहरांस शोभा आणीत.  रस्ते ४०/५० फूट रुंद असत. रस्ते निर्मळ व सारखे असत.  त्याला चढउतार नसे.  इमारतीस लागणारे मोठमोठे दगड सुरूंग लावून फोडून आणीत! मय लोकांच्या इमारतींमध्ये एकच व्यंग असे.  तें हें कीं, कमानी बांधण्याचे त्यांना माहीत नव्हतें.  कमानींमुळे इमारती जास्त टिकतात.

वनस्पतिशास्त्रांतहि त्यांची चांगलीच प्रगति झाली होती.  निरनिराळया प्रकारचीं धान्यें, फळें, बटाटें, तंबाखू, रताळी, कोको, रबर इत्यादि खास अमेरिकेंतील चिजा - ज्या आज जगभर पसरल्या आहेत त्या मयांच्या नित्य परिचयांतील होत्या.  या सर्व वस्तूंची ते लागवड करीत.  कापूस जरी त्या काळीं पाश्चात्यांस माहीत नसला, तरी मय लोकांस तो माहीत होता.  ते कापूस पिकवीत व त्याची सुंदर वस्त्रें विणीत!  रानटी लोकांप्रमाणे केवळ कातडीं व झाडाच्या साली यांनी ते शीतनिवारण करीत नसत - तर ते लोकरीचींहि वस्त्रें मोठी सुंदर विणीत.  औषधी वनस्पतींची तर त्यांस फारच माहिती होती.  विषारी वनस्पति त्यांस पुष्कळ माहीत होत्या.   हिंवतापावर क्विनाईन (कोयनेल) शोधून काढून जर कोणी सर्व जगावर उपकार केले असतील तर ते या मय लोकांनीच  क्विनाईन व कोकेन या औषधांचे जनकत्व मय लोकांकडे आहे.  रबराची लागवड व त्याचे निरनिराळे उपयोग जगास प्रथम मयांनीच शिकविले.  शस्त्रक्रियेच्या बाबतींत ते बरेच पुढें गेले असावे.  रोग बरे करण्यासाठी शरीरच्छेदनांत ते निरनिराळया शस्त्रांचा उपयोग करीत.  क्लोरोफॉर्मसारखा कांही तरी शोध त्यांना माहीत असावा.  दांत किडला म्हणजे हल्ली तो काढून टाकतात,  किंवा त्याला पडलेलें भोंक अधिक स्वच्छ करून त्यामध्यें सोनें चांदी किंवा अशाच प्रकारची अन्य धातु बसवतात.  ही कला मय लोकांना पूर्ण अवगत होती.  सोनें चांदी ऐवजीं ते पोलाद बसवीत.  आपल्या ऋग्वेदांतहि पेदु नांवाच्या लंगडया माणसाला लोखंडी पाय बसवल्याची कथा आहे.  पुढें आलेले दांत वाईट दिसतात म्हणून मयांचे शस्त्रवैद्य ते दांत कानसून काढीत व तसें करतांना कांही इजा होणार नाहीं अशी खबरदारी घेत.  अशा प्रकारें किडक्या भागांत पोलाद असलेले दांत सांपडले आहेत.

गोड निबंध - भाग २

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
गोड निबंध - २ 1 गोड निबंध - २ 2 गोड निबंध - २ 3 गोड निबंध - २ 4 गोड निबंध - २ 5 गोड निबंध - २ 6 गोड निबंध - २ 7 गोड निबंध - २ 8 गोड निबंध - २ 9 गोड निबंध - २ 10 गोड निबंध - २ 11 गोड निबंध - २ 12 गोड निबंध - २ 13 गोड निबंध - २ 14 गोड निबंध - २ 15 गोड निबंध - २ 16 गोड निबंध - २ 17 गोड निबंध - २ 18 गोड निबंध - २ 19 गोड निबंध - २ 20 गोड निबंध - २ 21 गोड निबंध - २ 22 गोड निबंध - २ 23 गोड निबंध - २ 24 गोड निबंध - २ 25 गोड निबंध - २ 26 गोड निबंध - २ 27 गोड निबंध - २ 28 गोड निबंध - २ 29 गोड निबंध - २ 30 गोड निबंध - २ 31 गोड निबंध - २ 32 गोड निबंध - २ 33 गोड निबंध - २ 34 गोड निबंध - २ 35 गोड निबंध - २ 36 गोड निबंध - २ 37 गोड निबंध - २ 38 गोड निबंध - २ 39 गोड निबंध - २ 40 गोड निबंध - २ 41 गोड निबंध - २ 42 गोड निबंध - २ 43 गोड निबंध - २ 44 गोड निबंध - २ 45 गोड निबंध - २ 46 गोड निबंध - २ 47 गोड निबंध - २ 48 गोड निबंध - २ 49 गोड निबंध - २ 50 गोड निबंध - २ 51 गोड निबंध - २ 52 गोड निबंध - २ 53 गोड निबंध - २ 54 गोड निबंध - २ 55 गोड निबंध - २ 56 गोड निबंध - २ 57 गोड निबंध - २ 58 गोड निबंध - २ 59 गोड निबंध - २ 60 गोड निबंध - २ 61 गोड निबंध - २ 62 गोड निबंध - २ 63 गोड निबंध - २ 64 गोड निबंध - २ 65 गोड निबंध - २ 66 गोड निबंध - २ 67 गोड निबंध - २ 68 गोड निबंध - २ 69 गोड निबंध - २ 70 गोड निबंध - २ 71 गोड निबंध - २ 72 गोड निबंध - २ 73 गोड निबंध - २ 74 गोड निबंध - २ 75 गोड निबंध - २ 76 गोड निबंध - २ 77 गोड निबंध - २ 78 गोड निबंध - २ 79 गोड निबंध - २ 80 गोड निबंध - २ 81 गोड निबंध - २ 82 गोड निबंध - २ 83 गोड निबंध - २ 84 गोड निबंध - २ 85 गोड निबंध - २ 86 गोड निबंध - २ 87 गोड निबंध - २ 88 गोड निबंध - २ 89 गोड निबंध - २ 90 गोड निबंध - २ 91 गोड निबंध - २ 92 गोड निबंध - २ 93 गोड निबंध - २ 94 गोड निबंध - २ 95 गोड निबंध - २ 96